महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम येथे आरती निराधार सेवा फॉउंडेशन दिव्यांग मुलांचे व वृद्धांचे वासतिगृह आहे. येथे निराधार मुलांचे व वृद्धांचे काळजीपूर्वक संगोपन केले जाते, राहण्याची उत्तम सोय तसेच आणि आधार दिला जातो. या फाऊंडेशन चे समाजकल्याणकारी कामाला आपल्या कडून मदतीचा हात मिळावा यासाठी ही बाब रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे व संचालक मंडळ यांच्या समोर मांडली. याचा विचार करुन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आरती निराधार सेवा फॉउंडेशन यांस रु. ५०,०००/- ची आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी आरती फॉउंडेशन चे संस्थापक सौ. अनिता नारकर, श्री. आत्माराम नारकर, नाम जोशी, माजी प. स. सभापती , संगमेश्वर सुजित महाडीक, माजी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मीनल काणेकर, बँक कर्मचारी नरेश कदम, प्रतीक चव्हाण आदी उपस्थित होते.
0 Comments