महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुक्याच्या वतीने वनवास यात्रेचे स्वागत करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यवत सहभागी सहभागी झाले . तत्पूर्वी २१रोजी. वरवंड, तालुका दौंड या गावात भव्य कॉर्नर सभा पार पडली. ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण ही भूमिका समाजात सर्वमान्य होत आहे. मराठा समाजाला या एका मागणीवर एक मुखाने एकत्र आणण्यासाठी आम्ही वनवास यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या २४ तारखेला वानवडी येथे आणि २५ तारखेला लाल महाल येथे सभा याप्रमाणे मराठा वनवास यात्रा पुणे शहरात असेल. रात्री एक ओबीसी नेते सभेत बोलले. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थन केले. पण ते ५०% च्या वरची भाषा बोलून गेले. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सर्वच नेत्यांना काही गोष्टी समजाऊन सांगण्याची संधी मिळाली यवत येथे दि २१ रोजी रात्री एक ओबीसी नेते सभेत बोलले. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थन केले. पण ते ५०% च्या वरची भाषा बोलून गेले.
समस्त गावकऱ्यांच्या वतीने संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम देण्यात आले होते .श्री काळभैरव मंदिर मध्ये मराठी समाज बांधवांनी स्वागत केले श्री सतीश दोरगे पाटील (अध्यक्ष देवस्थान कमिटी यवत) श्री दत्तात्रेय बोत्रे, दीपक तांबे दादा दोरगे समीर लोहकरे ,दीपक मोटे महाराज, गोपाळ माळवदकर,श्री जाधव सर,सुरज चोरगे, मयुर सुळसकर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दि 22 रोजी सकाळी कासुर्डी फाटा येथे नाश्ता व चहाचे नियोजन करण्यात आले होते मराठा समाजाला ५० %च्या आतून ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्वांनी पाठिंबा दिला यावेळी डाळिंबचे विशाल कुंजीर, विशाल राजवडे, संजय थोरात,विकास टेमगिरे,राहुल शेळके, अतुल आखाडे,संतोष आखाडे,जाधव सर, तुषार आखाडे, हरिभाऊ वीर, महेंद्र आखाडे आदि उपस्थित होते. मयूर सोळसकर: दादासो माने, राहुल दोरगे कडेठाणचे गणेश दिवेकर उपस्थित होते.
0 Comments