#Yavat:महेश पासलकर शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) यांचा शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश



महादरबार न्यूज नेटवर्क -  अक्षता हनमघर
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाचे उपनेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत कुठेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने उद्धव ठाकरे गटाला एकही जागा दिली नाही. याउलट त्यांचे फोटो वापरून महाविकास आघाडीच्या नावाने निवडणुका लढल्या. या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकही जागा आपल्याला देण्यात आलेली नसताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराला येत होते. उद्धव ठाकरे गटाचे खच्चिकरण करून काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्याच्या या प्रकारामुळे व्यथित होऊन त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत