#Bhor:२५ वर्षे मुलाप्रमाणे सांभाळलेल्या पाख-या बैलाचा तेरावा विधी केला थाटात
गवडी (ता.भोर) येथे पाख-या बैलाच्या तेरावा विधी साठी जमलेले नातेवाईक आणि ग्रामस्थ
महादरबार न्यूज नेटवर्क - दिपक येडवे
गवडी (ता.भोर) येथील प्रगतिशील शेतकरी बाजीराव रामभाऊ साळुंके यांच्या घरातील गाईचा बैल पाख- या होता. बैलाने शेतीत केलेल्या काबाडकष्ट मुळे पाख- याचा तेरावा विधी थाटात करण्यात आला. बैलाचं आणि शेतकऱ्याचं अतुट नातं असतं शेतकरी आपल्या बैलांना जीवापाड जपतात.प्रेम करतात घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात, शेतकरी हा बैलांच्या भरोशावर शेती करतात. पण, तो बैलाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.
पाख-या या लाडक्या बैलाचा माणसांप्रमाणे तेरावा विधी केला. २५ वर्षे मुलाप्रमाणे संभाळलेल्या कैलास बैलाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. विधिवत पूजा करून,१३ बैलजोडींना औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पुरणपोळी बैलांना खाऊ घातली.तसेच बैलांना मुरकी हा साज देण्यात आला,बैल मालकांना टाॅवेल टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तेराव्याला संपूर्ण गावाला पुरणपोळीचे गाव जेवण देण्यात आलं. तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते.परिसरात सध्या शेतकरी बाजीराव साळुंके आणि त्यांच्या बैलाच्या प्रेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
Comments
Post a Comment