#Yavat:खाण क्रेशर उद्योगास खोर ग्रामस्थांचा विरोध- सरपंच वैशाली अडसूळ


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
चविस्ट आणी मधुर अंजीर फळ उत्पादनासाठी तालुक्यासह जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या खोर येथे होऊ घातलेल्या खाण क्रेशर उद्योगास ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठरवाद्वारे प्रचंड विरोध झाल्याचे सरपंच वैशाली अडसूळ यांनी नमूद केले आहे.

यासह खोर ग्रामपंचायत अस्तित्वात असे पर्यंत खोर गाव आणि परिसरात खाण  क्रेशर उद्योग ,वाळू ,मुरूम आणि माती उपसा हे अवैध धंदे गावात सुरू करू देणार नाही. असा विधायक ठराव यावेळी मंजूर करण्यात आला आहे.
खोर ग्रामपंचायत सर्वसाधारण सभा सरपंच वैशाली अडसूळ यांचे उपस्थितीत घेण्यात आली.
या बैठकीत  खोर परिसरात आशिष अशोक  काळभोर यांना शेत जमीन गट नम्बर ७७८ मध्ये खाण क्रेशर, व मालवाहतूक व्यवसाय माजी सरपंच सुभाष चौधरी  यांचे कार्यकाळात २६ जानेवारी २०१८ च्या ग्रामसभेत एकमताने ठरवाद्वारे  महाराष्ट्र् प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी पुणे आणि तहसीलदार दौंड यांची रीतसर परवानगी घेऊन क्रेशर व्यवसाय सुरू करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे काळभोर यांनी कळविले होते.
त्यानुसार काळभोर यांनी ग्रामपंचायत पत्राप्रमाणे रीतसर परवानग्या घेऊन खडी क्रॅशरचे काम सुरू केले होते.  मात्र हा उद्योग आत्ता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
सध्या झालेल्या ग्रामसभेत , पूर्वीच्या सरपंच यांनी दिलेली परवानग्या आम्हास मान्य नाहीत, आम्ही खडी क्रेशर उदयोग सुरू होऊ देणार नाही असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
या ग्रामसभेत सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते, अहवाल वाचन विठलं रायते ग्रामविकास अधिकारी  यांनी केले.


शेत जमिनी आमच्या मालकीच्या आहेत आमच्या हक्काच्या जमिनीत आम्ही काहीही उद्योग सुरु  करू शकतो, कोणाला अडचण वाटत असेल त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांचेकडे तक्रार करावी त्यांना उत्तर देण्यास आमची तयारी आहे.
 दिलीप डोंबे- माजी  सरपंच



खोर गाव चविस्ट आणि मधुर अंजीर फळ उत्पादनासाठी तालुक्यासह जिल्ह्यात प्रसिद्ध आहे, येथे जवळपास ५०० हुन अधिक शेतकऱ्यांच अंजीर उत्पादन हे प्रमुख पीक आहे, येथील शेतकऱ्यांनाचा फळ उत्पादन यासह कांदा तरकारी पिके घेतात,यावरच प्रपंच अवलंबून आहेत, खाण क्रेशर व्यवसाय सुरू झाल्यास प्रचंड धूळ निर्माण होईल, या धुळीमुळे फळ बागा व शेतपिके यावर परिणाम होईल, पर्यावरण यासह मानवी जीवनावर गंभिर परिणाम होतील, प्रपंच अडचणीत येतील.
समीर डोंबे  - अंजीर उत्पादक.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत