#Yavat:नोकरीच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची संकल्पना गरजेचीच - प्रा. रेश्मा ताडगे


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
कौटुंबिक गरजेपोटी लेकुरवाळ्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणाघराची संकल्पना अस्तित्वात आली, परंतु त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणी हिरकणी कक्षाचीसुद्धा तेवढीच गरज असल्याचे मत प्रा. रेश्मा ताडगे ह्यांनी  व्यक्त केले. खुटबाव येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयातील हिरकणी कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आपल्या बाळासाठी रात्रीच्या वेळी बिकट अशा कड्यावरून उतरणाऱ्या हिरकणीचा छ. शिवाजी महाराजांनी योग्य असा सन्मान केला. तोच आदर्श समोर ठेवून आठवड्यातील किमान एक दिवस तरी नोकरीच्या ठिकाणी आपल्या बाळांसोबत थांबण्याची सोय प्रत्येक कार्यालयात करण्यात यावी, अशीही अपेक्षा त्यांनी ह्यावेळी व्यक्त केली.
    
प्रा. डॉ. मनीषा सोडनवर, प्रा. योगिता दिवेकर, प्रा. दीप्ती सातव तसेच प्रा. अर्चना मेमाणे ह्यांनी आपल्या बाळांच्या सोयीसाठी महाविद्यालयात हा कक्ष सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जगदीश आवटे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. सुनिता बनकर ह्यांनी ह्या उपक्रमाचे आयोजन केले. संस्थेचे  चेअरमन मा. रमेशआप्पा थोरात ह्यांनी हा उपक्रम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम