#Yavat:शाहू फुले आंबेडकरी विचाराने थोरात कुटुंबाची वाटचाल होत आहे, हे स्तुत्य आहे - धम्मा नदं
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
काल कथित भास्कर राव बाबुराव थोरात यांचे मुले आणि कुटुंबाची वाटचाल ही वडिलांच्या शिकवणुकीचा आदर्श घेऊन शा हु फुले आंबेडकरी विचारानुसार चालू आहे, ही बाब स्तुत्य व परिवर्तनशील आहे, असे विचार भन्ते धम्मानदं यांनी गिरीम येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहेत.
कथित भास्करराव बाबुराव थोरात प्रतिष्ठान यांचे वतीने भास्करराव थोरात प्रथम स्मृतिदिन आणि यानिमित्त जेष्ठ पत्रकार एम. जी. शेलार यांना " जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम थोरात यांचे निवस्थानी आयोजित करण्यात आला होता.
यावेंकी पूजा आणि बौद्ध धम्माची शिक्षण यावर भन्ते धम्मानन्द आणि विचार व्यक्त केले, परभणी येथील व्याख्याते नितीन सावन्त यांनी राष्टीय पुरुषांची शिकवण या विषयावर व्याख्यान दिले, सुरुवातीस बौद्ध मूर्ती आणि आंबेडकर प्रतिमेचे पूजन उपासक श्रीकृष्ण मोरे यांनी केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश थोरात, उपाध्यक्ष मिलिंद थोरात,आणि सचिव नितीन थोरात यांनी जेष्ठ पत्रकार एम,जी, शेलार यांचा स्मृतिचिन्ह, शाल आणि महात्मा फुले यांचे पुस्तक देऊन सत्कार केला, यावेळी गिरीमचे माजी सरपंच नन्दु खताळ,, किसन मदने यांचाही सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमास महेंद्र गायकवाड, भगवान इगवे, सचिन कांबळे, अनिल गायकवाड, विकास आढाव, प्रकाश कसबे, केशव कुदळे, झुंबर शिंगटे, विलास गोरे,वल्ली पठाण, नन्दु गायकवाड, अर्जुन फुलारी ,प्रकाश जाधव या मान्यवर यांचेसह ग्रामस्थ आणि बोरिबेल राहू येथील आप्तेष्ट आणि मित्र मंडळी उपस्थित होती,
प्रास्तविक नितीन थोरात, सूत्रसंचालन यश बनसोडे आणि आभार वैभव इगवे यांनी मानले.
Comments
Post a Comment