#Natepute: प्रेम भैया देवकाते, सागर बिचुकले, विशाल साळवे यांच्या धरणे आंदोलनाला यश


मागण्या मान्य झाल्याने धरणे आंदोलन स्थगित


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते तालुका माळशिरस येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्काम शुक्रवारी असल्याने या ठिकाणी करमणुकीसाठी छोटे मोठे पाळणे आलेले आहेत. या  पाळण्यामध्ये सामान्य जनतेला बसता यावे तसेच आनंद घेता यावा यासाठी नातेपुते नगरपंचायत ला पाळण्याचे दर कमी करण्यासंदर्भात निवेदन दिले होते.


घेतल्याने निवेदनाची दखल न घेतल्याने प्रेम भैया देवकाते, सागर बिचुकले, विशाल साळवे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते.
आंदोलनास बहुतांशी नागरिकांनी पाठिंबा दिला.

आंदोलनाची दखल घेत नातेपुते नगरपंचायतने पाळण्याचे दर कमी केले.
अखेर पाळण्याचे दर कमी करण्यात यश मिळाले. पाळण्याचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे वीस रूपये ते पन्नास रुपये असे ठेवण्यात आले.

पाळण्याचे दर कमी करण्यात आल्याने उपोषण करते यांनी आपले आंदोलन थांबविले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत