#Chiplun:माखजन बाजारपेठेला आमदार शेखर निकम यांनी स्वखर्चाने केले गाळमुक्त
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
माखजन बाजारपेठेतील गड नदीतील गाळ अनेक दिवसांपासून साचून राहिला होता. त्यामुळे तेथील व्यापारी वर्गासह नागरिकांचे हाल होत होते. हि अडचण ओळखून येथील आमदार शेखर निकम यांनी स्वखर्चाने गाळ काढून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून त्यांची सुटका केली.
माखजन बाजारपेठ ही आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी सोयीची अशी आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे तेथील नाल्यांमध्ये गाळ साचून दुर्गंधी पसरली होती. स्थानिक प्रशासनाला अनेकदा कळवूनही, गाळ काढण्यासाठी वारंवार पत्र देऊनही प्रशासन गेली 2 वर्ष माखजन बाजारपेठेकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हते. चिपळूणपेक्षाही माखजन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी भरुन व्यापारी, शेतकरी तसेच घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.
माखजनवासियांची हीच अडचण ओळखून येथील लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी गाळ काढण्यासाठी आपल्या स्वखर्चाने जेसीबी देऊन गाळ काढण्याचे काम चांगल्या प्रकारे करुन दिले. दोन वर्षांपासून प्रलंबित गाळ प्रश्न सोडवून व्यापारी, शेतकरी व नागरिकांची होणारी गैरसोय दूर केल्याबद्दल माखजन बाजारपेठेतील व्यापारी, शेतकरी यांनी शेखर निकम यांचे शतशः आभार मानले.
दरम्यान माखजनचे सरपंच महेश बाष्टे, रुपेश गोताड, सुर्यकांत कोकाटे, गजानन पवार,अजिज आलेकर, बाबु चव्हाण, आसिफ खोत, जयंत धामणकर व इतर ग्रामस्थ यांनी उपस्थित राहुन गाळ काढुन घेतला.
Comments
Post a Comment