Hot Posts

6/recent/ticker-posts

#Solapur:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यात स्वागत


सोलापूर, दि. 25 (जि. मा. का.) :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सोलापूर विमानतळ येथे जिल्हावासियांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने व सहायक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी आले होते.


Post a Comment

0 Comments