#Varvand::दौंडच्या पश्चिम पट्ट्यात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनामघर
दौंड तालुक्यात दि २४,२५रोजी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्गात नागरिकांमध्ये व व्यापारी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे तालुक्यात सर्वत्र शेतकरी वर्ग सुखावलेला आहे वरवंड कडेठाण देवळगाव माळवाडी पडवी, येथील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे खरीप लागण्यासाठी आवश्यक असणारा पाऊस आता पडण्यास सुरुवात झालेली असून दोन दिवस सतत पाऊस चालूच आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नागरिकांमध्ये व्यापारी वर्गात मंदीचे वातावरण आहे शेतकऱ्यांकडे चलंन फिरले तरच व्यापारी चलन फिरत असते असे मानले जाते. खरीप पिकांसाठी तसेच होऊ लागण्यासाठी हा पाऊस चांगला आहे पडणाऱ्या पावसामुळे बाजरी, सूर्यफूल,कांदा, ऊस ची लागवड शेतकरी वर्ग आता करू शकतो. एकंदरीत पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र समाधान आहे उशिरा आलेला पावसामुळे त्यांच्यामध्ये एक चिंता होते ती कमी झालेले आहे आता ते आपले पिके वाचू शकतात .सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी थोड्या फार कमी होतात.
Comments
Post a Comment