#Yavat:दौंडच्या जनतेने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवेन- आमदार राहुल कुल
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
शेतीच्या पाण्याचा पाऊस लांबल्याने प्रश्न गंभीर होऊ लागला , परंतु चिंतेचे प्रश्न नाही, मुळशीचे पाणी मिळवून दौंडच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवेन,असा निर्धार दौंडचे आमदार राहुल कुल यांनी श्री क्षेत्र विठलं बन डाळिंब येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे,
दौंड हवेली आणि पुरंदर या तीन तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या आणि या भागातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठलंबन डाळिंब येथील एकादशी निमित्त पूजा आमदार राहुल कुल यांनी केली,
विठ्ठल बन देवस्थान ट्रस्ट डाळिंब आणि ग्रामपंचायत डाळिंब याचे वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आमदार कुल आपल्या भाषणात पुढे म्हणाले , दौंडच्या जनतेने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवेन,
दौंड तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवले आहेत, काही राहिले आहेत, तेही लवकरच सोडवले जातील, प्रश्न कोणताही असू द्या, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवेन, याची ग्वाही देत आहे,
यावेळी दौंडचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात आपल्या भाषणात म्हणाले, पाऊस लांबला आहे, अन्यही प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न सुटावेत, भरपूर पाऊस पडावा,बळी राजा सुखी व्हावा, अशी प्रार्थना विठलं चरणी करीत आहे.
पूर्णतः निसर्गरम्य असलेले हे विठ्ठल बन डाळिंब आहे . सर्वत्र झाडे आहे त्यामुळे येथील यात्रेचे रूप सुंदर असते. सर्वत्र झाडे असल्यामुळे मन प्रसन्न होते
यावेळी डाळिंब चे सरपंच बजरंग म्हस्के यांचेही भाषण झाले, या कार्यक्रमास दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, जिल्हा परिषद सदस्य कीर्ती कांचन, प्रकाश शेलार, तुकाराम ताकवणे, नितीन दोरगे, महादेव यादव, डॉ रवींद्र भोळे , महादेव कांचन,माऊली कांचन, सरपंच सागर शेलार, मनिभाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष भाई चौधरी, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, खामगावचे सरपंच मदने, अभि ताम्हाणे, राजेन्द्र तावरे, सर्जेराव म्हस्के, देवस्थानचे सर्व सदस्य, या मान्यवर यांचे सह हजारो भाविक उपस्थित होते.
या परिसरातील ही मोठी यात्रा असुन येथे विविध दुकाने मिठाईची ,खेळण्याची लहान मुलांना लागणारे खेळणी त्याची स्टेशनरीची वस्तूची दुकाने आलेली आहेत पाळणे आले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्तविक देवस्थानचे अध्यक्ष आणि डॉ मनिभाई पत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी, सूत्रसंचालन सचिन एल, बी, म्हस्के यांनी तर आभार तानाजी म्हस्के यांनी मानले.
दिवसभर भजनी मंडळ, आणि गावोगावचे ढोललेझीम खेळ आलेले होते, खेळ पाहून बक्षीस देण्याचे आले,
चालू वर्षी जवळपास दीड लाख भाविक पहाटे पासून आलेलेत, या साठी सेवा सुविधा देवस्थान समितीने आद्यवत केल्याचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी सांगितले.
Comments
Post a Comment