Hot Posts

6/recent/ticker-posts

#Varvand:तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना मराठा ओबीसी आरक्षणचे निवेदन



 मराठा वनवास यात्रा प्रमुख योगेश केदार 



महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
गल्ली ते दिल्ली एकच विषय मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण. दि(२७) लातुळजापूर येथे तेलंगणचे राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनजागृती विषयी माहिती दिली. देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ओबीसी आरक्षण संदर्भातील निवेदनही दिले. सद्ध्या आम्ही सर्वत्र केवळ एकच विषय घेऊन वावरत आहोत. तो म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण. एखादा शेतात राबणारा शेतकरी असो की एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, सर्वांना फक्त तोच विषय समजावत आहे. 

तेलंगणा राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी असलेले हरीश राव यांनी काल मला सहज फोन केला होता. ते सद्ध्या अर्थ आणि सार्वजनिक आरोग्य अश्या दोन महत्वूर्ण खात्याचे मंत्री आहेत. ते मला म्हणाले, योगेश भाई महाराष्ट्र मे आ रहे हैं, पंढरपूर और तुळजापूर का दर्शन करने वाले है. आप कहा हो? मी त्यांना म्हणालो की मैं बार्शी के आंदोलन के लिये आया हू. यहाँ से उमरगा जा रहा हुं. यहाँ से वापस आझाद मैदान जाऊंगा. त्यानंतर ते म्हणाले की मी तुमचे स्टेटस वगेरे बघत असतो. तुम्ही आमच्या पक्षात येण्याची ऑफर नाकारून निस्वर्थपणे तुमच्या समाजासाठी कष्ट करत आहात. मी म्हणालो की साहेब आमच्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मी माझी जबाबदारी पार पाडत आहे. आम्ही अनेक प्रश्नांवर त्यांच्या पक्षाच्या राज्यात होत असलेल्या प्रगती संदर्भात चर्चा केली.

नंतर त्यांनी हळूच सांगितले, की सोलापूर किंवा तुळजापूर येथे के सी आर साहेबांची भेट घ्याल का? सोलापूर ला आमच्या मित्राच्या घरी साहेब काही वेळ थांबणार आहेत. तुम्ही तिथे आलात तर छान भेट होईल. मी म्हणालो की सार्वजनिक ठिकाणी भेट घेयीन. माझ्या तालुक्यात आपण येत आहात, तुळजा भवानी मंदिरात भेटू. म्हणून त्या अनुषंगाने भेट झाली. चर्चा झाली.

माझा जीवन उद्देश हा ओबीसी आरक्षण विषयी जनजागृती करणे आहे. तो निसंकोच पद्धतीने सर्वत्र मांडत आहे. एक दिवस असा येईल की मराठा समाज हा ओबीसी आरक्षण मध्ये असेल.

Post a Comment

0 Comments