#Akluj:चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
अकलूज शाखेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त माननीय ज्योती माने पाटील माननीय रावसाहेब आप्पा मगर संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना व सौ. मधुमाला मगर, प्रगतशील बागायतदार नानासाहेब लोखंडे, मा. हर्षकुमार फडे सर मा. अनुप्रिता फडे व पंकज फडे प्रसिद्ध उद्योजक, तसेच प्रगतशील बागायतदार बापूसाहेब देशमुख, मा. डॉक्टर राणे सर मा.डॉ.कदम मॅडम मा. डॉ.वैष्णवी शेटे  मा. डॉ. सुरभी देशमुख , मा.डॉ.अजित गांधी , मा. श्रीनिवास कदम पाटील बारामती झटकाचे संपादक, मा. उमेश बनकर मा. प्रदीप कुमार मेहता, मा. रामचंद्र ठवरे संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखाना , श्री आनंद कोकाटे श्री तानाजीराव इंगवले देशमुख श्री गुड्डू लाल शेख श्री अभिजीत फाटे प्रसिद्ध उद्योजक , सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेचे श्री खंडागळे श्री वैभव पवार श्री कोडलिंगे सौ.देंडे मॅडम , क्षीरसागर मॅडम यांचे देखील उपस्थिती लाभली.


सर्व उपस्थित मान्यवरांचे सन्मान चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन श्री किशोर कुमार शहा सर यांनी केले यावेळी बारामती क्लस्टरचे क्लस्टर हेड दीपक वाबळे सर, एच आर कुलदीप जगताप सर उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये दिनांक आठ व नऊ जुलै पर्यंत रुपये तीन हजार रुपये इतक्या गुंतवणुकीवर चांदीचे नाणे मोफत मिळणार आहे. कोणत्याही सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यावर दहा टक्के इतका डिस्काउंट दिला जाणार आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांवर शंभर टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहेत. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त या सुवर्णसंधीचा फायदा दिनांक 9 जुलै पर्यंत घ्यावा ही विनंती चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चे चेअरमन किशोर कुमार शहा सर यांनी सांगितले. या वर्धापन दिनानिमित्त रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सामाजिकतेचे भान ठेवून  दिवसभर रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले होते.


बारामती विभागाचे सेल्स प्रमुख श्री दीपक वाबळे,  दीपक चव्हाण,श्री बंडू गोफणे, बालाजी वाघमारे , कुमार राठोड यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय माने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत