#Chiplun:आम्ही आमदार शेखर निकम सरांसोबतचं- संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आ. शेखर निकम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा घेतला निर्णय

देवरूखमधील पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी स्पष्ट केली भुमिका


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर- चिपळुणचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगत संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. संगमेश्वर तालुका राष्ट्रवादीतर्फे देवरूखात आज शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादीत बंडाळी झाल्यानंतर  संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात सापडले होते. त्यांच्यामध्ये चलबिचल होती. त्यांची भुमिका अद्यापही गुलदस्त्यात होती. तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नेमका कोणाला पाठींबा आहे. हेच कळत नव्हते. अखेर संगमेश्वर तालुका राष्ट्रवादीच्यावतीने आज शुक्रवारी देवरूख येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांना आपला पाठींबा असल्याची भुमिका स्पष्ट केली. आमदार शेखर निकम यांनी विकासकामांच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्याचा कायापालट केला असून यापुढेही भरघोस निधी देवून तेच तालुक्याचा विकास करू शकतात. असा विश्वास व्यक्त करून तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हणत त्यांना आपला पुर्णपणे पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेत दत्तात्रय उर्फ बाळू ढवळे, राजेंद्र पोमेंडकर, हुसेन बोबडे, दुर्वा वेल्हाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बाळू ढवळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले कि, आमदार शेखर निकम यांनी संगमेश्वर- चिपळूण मतदार संघातील विकासकामांसाठी तब्बल ४५० कोटी रूपयांचा निधी आणला आहे. देवरूख शहराच्या विकासासाठी ६.५० कोटीचा निधी निकम सरांनी उपलब्ध करून दिला आहे. याचबरोबर तालुक्यात तब्बल १५० बोअरवेल, रस्ता, पाखाड्या, साकव, पूल बांधून दिले आहेत. याव्यतिरिक्त ते निकम कुटुंबियांच्या वतीने गरजूंना मदतीचा हातही देत आहेत. त्यांची दानशूर वृत्ती सर्वानाच भावत आहे. असे सांगितले. तसेच राष्ट्रवादीच्या तालुक्यातील सर्व कमिट्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील दोनचार जणांनी शरद पवारांना पाठींबा दिला आहे. मात्र लवकरच आमदार शेखर निकम सर त्यांच्याशी बोलतील व त्यांचे मतपरिवर्तन करतील, असेही ढवळे यांनी बोलताना म्हटले. राजेंद्र पोमेंडकर यांनी आमदार शेखर निकम यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेतला नसून मतदारसंघातील जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच त्यांना आमचा सर्वांचा पाठींबा आहे.

हुसेन बोबडे यांनी बोलताना म्हटले कि, आमदार शेखर निकम गोरगरीबांचे कैवारी असून त्यांनी तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत. म्हणूनच त्यांना जनतेमधून आशिर्वाद मिळत आहेत. त्यांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याचे बोबडे यांनी म्हटले. तर दुर्वा वेल्हाळ यांनी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम सरांना पाठींबा दिल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेप्रसंगी बाळू ढवळे, राजेंद्र पोमेंडकर, मुराद आंबेडकर, सुशिल भायजे, योगेश रेडीज, हुसेन बोबडे, नितीन भोसले, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, मुरादपूर सरपंच मंगेश बांडागळे, प्रफुल्ल बाईत, किसन राणे, संकेत खामकर, जयराम माईन, अनंत जाधव, रामू पंदेरे, गणपत चव्हाण, दुर्वा वेल्हाळ, मानसी करंबेळे, जितेंद्र शेट्ये, प्रदीप कांबळे, वामनराव जाधव, देवेंद्र पेंढारी, शेखर उकार्डे, राज बोथरे, बंडू जाधव, अमित जाधव, मोहन पवार, सुबोध चव्हाण, राजू वणकुंद्रे, महेश बाष्टे, राम शिंदे, संतोष कांबळे, अकबर दसूरकर, हरीश्चंद्र गुरव, सिताराम आग्रे, सुनील बेर्डे, रविंद्र लाड, ओमकार गायकवाड, अश्विनी नलावडे, पपी पेंढारी, विकास राठोड, संकेत गुरव, प्रकाश सावंत, मंगेश कदम, शरद जाधव, विश्वास भोई, अरविंद भोई, पांडुरंग माने, संतोष हुमणे, गणपत माईन, निलेश गुरव, बावा कांबळे, काशिराम भेरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम