#Baramati:चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या सुवर्ण पेढीने स्त्री सन्मानासाठी बाईपण भारी देवा चित्रपट दाखविला मोफत


महादरबार न्यूज नेटवर्क -
चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.च्या माध्यमातून बारामती विभागामध्ये जवळपास 250 महिला काम करतात. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत शॉप मध्ये काम करून महिलांना घरी देखील जास्तीचा वेळ द्यावा लागतो. अशावेळी या महिलांना विरंगुळा म्हणून सदर सुवर्णपेढीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. महिलांना स्वतःचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. उत्तम काम करणाऱ्या महिलांना रोख स्वरूपात वस्तू स्वरूपात अशी बक्षिसे देखील दिली जातात. यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. या सुवर्ण पेढीमध्ये जवळपास 80% महिला कार्यरत आहेत. सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेला बाई पण भारी देवा हा चित्रपट महिलांच्या कार्यकर्तृत्वावर भाष्य करणारा  चित्रपट आहे व असा चित्रपट अनेक दिवसानंतर  प्रदर्शित झाला आहे.


महिला वर्गाने या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.250 महिलांना या सुवर्णपेढीच्या माध्यमातून मोफत चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चे चेअरमन श्री. किशोरकुमार शहा व सौ.नेहा किशोरकुमार शहा यांच्या कल्पनेतून देण्यात आली आहे.


बारामती मधील प्रसिद्ध तारा सिनेमागृहामध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला. यामध्ये बारामती व एमआयडीसी शाखेमधील तसेच कार्पोरेट ऑफिस मधील सर्व महिलांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. चंदुकाका सराफ मध्ये महिलांना देखील तितकेच महत्त्वाचे स्थान देऊन मॅनेजर पदापर्यंत महिला कार्यरत आहेत.तसेच अकलूज शाखेच्या माध्यमातून देखील श्रीराम सिनेमागृहामध्ये हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. अशा अनेक उपक्रमांच्यामुळे येथील सर्व स्टाफ हा आनंदी व समाधानी असल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळते. तसेच या सुवर्णपेढीमध्ये  सहलींचे देखील आयोजन करण्यात येत असते.

सध्या लेक जावयाचा लाडका उत्सव सुरू झाला आहे या अधिक मासामध्ये आपण आपल्या लाडक्या जावयांसाठी खरेदी करण्याकरिता वेगवेगळी ऑफर आणि डिस्काउंट देखील दिलेली आहेत. याचा देखील आपण जरूर लाभ घ्यावा असे चंदुकाका सराफ अँड सन्स चे सेल्स हेड दिपक वाबळे सर यांनी आवाहन केले आहे.

यावेळी एच आर कुलदीप जगताप,निलेश हुंबे ,रोहित आवदे,राहुल घोरपडे, बाहुबली मेंढेगिरी हे देखील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम