#Malshiras:एक राखी सैनिकांसाठी,माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबाने पाठवल्या सीमेवरील सैनिकांना राख्या
महादरबार न्यूज नेटवर्क -
आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी दिवस रात्र तैनात असलेले सैनिक त्यांच्या कुटुंबियांसोबत कोणतेच सण साजरे करू शकत नाहीत.पुढील महिन्यात येणाऱ्या बहीण- भाऊ यांचया पवित्र नात्यातील "रक्षाबंधन" या सणालाही बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही, अशा अनेक सैनिक भावांसाठी" एक राखी सैनिकांसाठी " ही संकल्पना मनात रुजवून माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबीयांनी आपल्या स्वतःच्या हाताने तिरंगा कलरमध्ये राख्या तयार करून आपल्या भारत मातेच्या विविध सीमेवरील सैनिकांना पाठवल्या.
रक्षाबंधन उत्सव हा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र भारत मातेचे रक्षण करणाऱ्या देशाचे सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबासोबत उत्सवात सहभागी होता येत नाही. परंतु, सीमेवरील सैनिकांना आपल्या बहिणीच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबीयांनी यंदाही भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी, कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने घरीच तिरंगा कलर मध्ये एक हजार राख्या तयार केल्या आहेत.
आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या,दिवस रात्र देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या सैनिकांसाठी माळशिरस मधील वाघमोडे कुटुंबीय सैनिकांप्रती प्रेम, आपुलकी निर्माण व्यक्त करत याही वर्षी प्रेमाचे प्रतीक असलेली राखी देशातील 12 युनिट मधील जवानांना पाठवल्या आहेत.
कोरोना काळात सगळं जग घरी बसलं होत पण आपले जवान आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात होते.खर तर ते आहेत म्हणून तर आपण सुरक्षित आहोत. शांत झोप घेऊ शकतो. म्हणजे आपले खरे रक्षणकर्ते आपले सैनिक भाऊच आहेत म्हणून एक राखी सैनिकांना ही कल्पना सुचली आणि त्या संकल्पनेचा कुटुंबियांसोबत चर्चा केली आणि आपण घरीच राख्या तयार करून सीमेवरील जवानांना पाठवूया का अस विचारले असता सर्वजण तयार झाले .राखी म्हणजे केवळ धागा नाही तर त्या धाग्यात प्रेम ,आपुलकी आहे असे वाघमोडे कुटुंबाने सांगितले.
या कार्यक्रमासाठी माळशिरस पंचायत समितीचे बीडिओ विनायक गुळवे, माळशिरस नगरपंचायतिचे मुख्याधिकारी नितीन गाढवे,नगराध्यक्ष डॉ आप्पासाहेब देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर,उपनगराध्यक्ष अजिनाथ वळकुंदे,नगरसेविका ताई वावरे,नगरसेविका पद्मावती कोळेकर,त्रिदल सैनिक संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आढाव, त्रिदल सैनिक संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश तोरसे,जेष्ठ माजी सैनिक सुभेदार मेजर माने, माजी सैनिक मारुती वाघमोडे,पूजा पुजारी, माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय हुलगे, एल डी वाघमोडे, पालवे, कृष्णा लावंड, सुजाता गोखले, मेडिकल असोसिएशनचेचे प्रकाश आंबुडकर,सचिन गाडेकर,नितीन गायकवाड, मकरंद कुदळे,प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गोरख जानकर,ग्रामसेवक संतोष पानसरे,तालुक्यातील माजी सैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बीडीओ विनायक गुळवे,जेष्ठ माजी सैनिक सुभेदार माने ,भाजपा किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, मुख्याधिकारी नितीन गाढवे ,त्रिदल सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आढाव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
तालुक्यातील माजी सैनिक व वाघमोडे परिवाराचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धाइंजे सर यांनी केले.
Comments
Post a Comment