महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप रयत शिक्षण संस्थेचे नागेश्वर विद्यालय व कै. मधुकरराव गंगाजीराव शितोळे ज्युनिअर कॉलेज पाटस येथील इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण११ विद्यार्थी पात्र झाले असून, त्यातील सपकाळ संस्कार माणिक व कु गवळी श्रेया नवनाथ हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. त्यांना शासनाकडून ७५०० रुपये प्रमाणे वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे.
तसेच एन.एम. एम.एस परीक्षेत विद्यालयातील २८ विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी कुमारी खटावकर वैष्णवी महादेव आणि कुमारी गवळी श्रेया नवनाथ हे दोन विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक झाले आहेत त्यांना वार्षिक १२ हजार रुपये प्रमाणे ६० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच नऊ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीधारक झाले असून त्यांना वार्षिक ९५०० प्रमाणे ४७५००रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचे एकूण २५ विद्यार्थी पात्र झाले आहे.
सर्व शिष्यवृत्तीधारक पात्र विद्यार्थ्यांचे विभाग प्रमुख सौ.दिवेकर शुभांगी, सौ. रंधवे मनीषा, सौ.थोरात अश्विनी व सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री नामदेव शितोळे, स्कूल कमिटी सदस्य श्री योगेंद्र बाबा शितोळे, श्री सिताराम भागवत, श्री बाळासो भागवत, मुख्याध्यापक श्री भारत लोखंडे, पर्यवेक्षक श्री संजय भोसले, उपशिक्षक श्री.अतुल दिवेकर श्री.उत्तम रुपनवर, सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामस्थ, पालक आणि सर्व रयत सेवक यांनी अभिनंदन केले.
0 Comments