#Yavat:अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दिल्लीच्या आंदोलनाला दौंड तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून पाठिंबा - मयूर सोळसकर जिल्हा युवक अध्यक्ष यांची माहिती


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दिनांक २५जुलै रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे.
यासाठी दौंड तालुक्यातील ६७ ग्रामपंचायत यांनी आपला जाहिर पाठिंबा पत्र तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना दिले आहे आणी सर्व पत्र दिल्ली येथे आंदोलनाला घेऊन जाणार आहेत. त्याच प्रमाणे विद्यमान आमदार राहुल  कुल, माजी आमदार रमेश  थोरात, रा. कॉ. अध्यक्ष अप्पासाहेब पवार आणी बोरमलनाथ देवस्थान ट्रस्ट यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे.अशी माहिती जिल्हा युवक अध्यक्ष मयूरआबा सोळसकर यांनी राहू ग्रामपंचायत येथील पत्रकार परिषद मध्ये दिली.


२०१४ साली व २०१६साली दिलेले राज्य सरकारने आरक्षण कोर्टामध्ये टिकले नाही. २०१६ मध्ये राज्यभरामध्ये मराठा क्रांती मोर्चा चे ५८ मोर्चे निघूनही मूळ मागणी प्रलंबित आहे.१९८१ पासून स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील व स्वर्गीय शशिकांत आप्पा पवार यांनी उभा केलेला लढा आजपर्यंत मराठा महासंघ लढत आहे.
विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप व युवक प्रदेशाध्यक्ष रणजीत दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे होत असलेल्या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ५०% ची मर्यादा कायदेशीर वाढवून मराठा समाजाला आरक्षण शैक्षणिक व नोकरीत  देण्यात यावे अशी प्रमुख मागणी घेऊन मराठा महासंघ आंदोलन करत आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित मराठा महासंघ युवक अध्यक्ष मयूर सोळसकर, जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष विशाल कुंजीर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज चोरगे, दौंड तालुका अध्यक्ष दिनेश गायकवाड दौंड तालुका युवक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, महिला अध्यक्ष मनिषा ताई नवले, लक्ष्मण शेठ कदम संतोष आखाडे, समीर लोहकरे,विकास शितोळे, चंद्रकांत आहेरकर,प्रशांत ताडगे, चंद्रकांत आखाडे, तुषार साठे, दिनेश गडदे, सतीशअण्णा लोहकरे,संदीप सोनवणे,हर्षल भटेवरा, बाबासाहेब कड, आप्पा दळवी आदि महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरपंच दिलीप देशमुख , उपसरपंच गणेश शिंदे,चेअरमन बाळासाहेब जगदाळे,मनिषा नवले,बापु कदम,आदि राहुकर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत