#Chiplun:कोंढ्रणमधील भूस्खलन बाधितांना आमदार शेखर निकम यांच्याकडून प्राथमिक स्वरूपाची मदत


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्रण गावामध्ये भूस्खलन झाल्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन संबंधित घटनेची पाहणी केली होती.

यावेळी निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्याकरिता पुनर्वसन मंत्री मा. श्री अनिल पाटील, पालकमंत्री मा.श्री उदयजी सामंत, जिल्हाधिकारी रत्नागिरी मा. श्री देवेंदर सिंग यांच्याकडे पत्रव्यवहार करून लवकरात लवकर बाधितांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. तशा पद्धतीचा अहवाल तहसीलदार श्रीम. अमृता साबळे व गटविकास अधिकारी श्री भरत चौगले यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आलेला आहे.

आमदार शेखर निकम यांच्या वतीने बाधित ५४ कुटुंबांना प्राथमिक स्वरूपाची मदत करण्यात आली. यावेळी सरपंच मुकेश बारगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शेठ बोथले, माजी सरपंच प्रफुल बाईत, उपसरपंच नितीन गोरीवले, तेजस शिंदे, उपसरपंच तुळसणी आप्पा बेर्डे, सिताराम आगरे, प्रथमेश निकम व गावचे पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत