महादरबार न्यूज नेटवर्क - बार्शी जिल्हा - सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय मातंग युवक संघटनेची बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुरूवर्य मातंग हृदयसम्राट श्री विठ्ठल साठे साहेब व प्रदेश अध्यक्ष श्री.शंकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील युवकांनची सभासद नोंदणी करू घेण्यात आली.व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख चि. केतन यादव यांच्या हस्ते कार्यकत्यांनी संघटनेत प्रवेश केला. या वेळी संघटनेत प्रवेश केलेल्या कार्यकत्यांनचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व संघटनेत स्वागत करून. बार्शी तालुक्यात गाव तिथे भारतीय मातंग युवक संघटना अशी बांधनी करण्यात यावी असे चि.केतन यादव म्हणाले.व सामाजिक व संघटनेचे काम करत असताना. भारतीय मातंग युवक संघटना पुर्ण ताकदीने बार्शी तालुक्यातील कार्यकत्यांनच्या पाठीशी असेल असेही म्हणाले. यावेळी भारतीय मातंग युवक संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख चि. केतन यादव यांचा बार्शी तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय मातंग युवक संघटनेचे गणेश जाधव,विभीषन कनगरे, संदीप जाधव, महेश जाधव, राजपाल जाधव, कृष्णा जाधव, रविराज पवार, राहुल गायकवाड,अतिश क्षिरसागर, सचिन ताटे, निलेश अवघडे, संजय थोरात, अशोक जाधव, ईश्वर घोलप,अक्षय नलवडे,यश रसाळ,अरविंद जाधव, कृष्णा जाधव आदी नुतन कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. व केतन यादव यांनी सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व गणेश जाधव यांनी आभार मानले.
0 Comments