#Delhi:चिपळूण शहराच्या पूर नियंत्रण प्रकल्पाबाबत आ. निकम यांची दिल्लीत केंद्रीय पर्यटनमंत्र्यांशी चर्चा

चिपळूणचा पूर नियंत्रणात येणार,
पर्यटन विकासाला चालना मिळणार



महादरबार न्यूज नेटवर्क -
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी  मंगळवारी सकाळी दिल्ली येथे केंद्रीय बंदर नौकानयन, जलवाहतूक आणि पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली. दाभोळ ते पेढे जलमार्ग, चिपळूण शहर पूर नियंत्रण प्रकल्प, तसेच पर्यटन संदर्भातील कामांबाबत सविस्तर चर्चा केली. ना. श्रीपाद नाईक यांनी या चर्चेबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

या भेटीवेळी आमदार शेखर निकम यांच्यासोबत राष्ट्रवादीचे युवा नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव, श्री. कपूर उपस्थित होते.

दाभोळ ते पेढे (गोवळकोट) या राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक २८ आणि पेढे येथील नियोजित रो रो आय डब्लू टी टर्मिनलला मंजुरी देऊन हे काम मार्गी लावल्याबद्दल आ. निकम यांनी मंत्री श्रीपाद नाईक यांचे आभार मानले. या जलमार्गाच्या विकासामुळे मालवाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूक आणि पर्यटन व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या जलमार्गाच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी आमदार शेखर निकम गेली दोन वर्षे श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावर करीत आहेत. या प्रकल्पामुळे चिपळूण शहराच्या पूर नियंत्रणालाही फायदा होणार आहे. चिपळूण शहर पूर नियंत्रणाबाबत केंद्राकडे पाठवायच्या प्रस्तावाबाबतही आ. निकम यांनी मंत्र्यांशी चर्चा केली. यासाठी संपूर्ण वाशिष्ठी नदीच्या उपमापासून ते संगमापर्यंतचा सखोल सर्व्हे आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, त्याचीही माहिती मंत्र्यांनी दिली.

चिपळूण शहर पूर नियंत्रणासाठी आमदार निकम यांचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि बंदर, नौकानयन, जलवाहतूक मंत्रालयाची सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या दोन महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त आपल्या मतदार संघातील ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पर्यटन विकासाच्या कामाबाबतही केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून या प्रकल्पाच्या कामाबाबतही आमदार निकम यांनी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत