#Solapur:स्वातंत्र्य दिनानिमित्त रेल्वे स्टेशनवर सेल्फि विथ पीएम आणि सेल्फि विथ क्लिन इंडिया उपक्रम


जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या हस्ते उदघाटन


केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूरचा मल्टीमीडिया प्रदर्शनातील उपक्रम



सोलापूर, दि. १७ : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली माघील ९ वर्षातील अनेक लोकाभिमुख योजनांची प्रभावी प्रचार प्रसार करण्यात येत आहे. यामध्ये विशेषतः स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशामध्ये लहान बालकापासून ते वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाने स्वच्छतेच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतला आहे. स्वच्छतेमुळे देशात अनेक बदल झालेले आहेत. याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात आलेल्या “सेल्फि विथ पीएम आणि सेल्फि विथ क्लिन इंडिया” या फोटो बूथला जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा आणि मेरी माटी मेरा देश अभियानाच्या अनुषंगाने रेल्वे स्टेशन येथे आयोजित केलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या “सेल्फि विथ पीएम आणि सेल्फि विथ क्लिन इंडिया” उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री सोनटक्के बोलत होते.

यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, पतंजली योगपीठाच्या केंद्रीय महिला प्रभारी सुधा अळळीमोरे, सोलापूर रेल्वे स्टेशन व्यवस्थापक सी एल मीना, सहायक स्टेशन व्यवस्थापक मनोज तिर्की आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री सोनटक्के म्हणाले देशभर स्वच्छतेची मोहीम सुरु आहे. या मोहिमेत सहभागी होण्याची संधी सोलापूरकरांना ““सेल्फि विथ पीएम आणि सेल्फि विथ क्लिन इंडिया” या उपक्रमाच्या माध्यमातून मिळाली आहे. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.

श्रीमती अळळीमोरे म्हणाल्या केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने आयोजित सेल्फी विथ पीएम हा अभिनव उपक्रम आहे. आजचे युग सोशल मिडीयाचे युग आहे आणि याचा सर्वात मोठा वापर करणारा युवक आहे. युवकांमध्ये सेल्फी बूथच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे चांगले माध्यम आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत मांडण्यात आलेल्या प्रदर्शनी मध्ये सेल्फी बूथ ठेवण्यात आले आहे. सदर सेल्फी बुथ दिनांक १५ ते १७ ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य आणि सकाळी ११ ते ९ वाजेपर्यंत खुले रहाणार असल्याची माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली. यावेळी सर्व मान्यवरांनी पीएम विथ सेल्फी घेतेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार अंबादास यादव यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने प्रवाशी उपस्थित होते.      

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम