Hot Posts

6/recent/ticker-posts

#Varvand:अठरा वर्षांनी कुसेगावच्या श्री भानोबा विद्यालयात विद्यार्थी स्नेह मेळावा


महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
दि.१३ . ८. २३रोजी श्री भानोबा विद्यालय कुसेगाव ता-दौंड जि- पुणे या ठिकाणी तब्बल १८ वर्षांनी मार्च २००६ च्या बॅचचे विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी एकत्र आले होते.


यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वर्गवासी मित्र व त्यावेळचे सेवकवर्ग यांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत बैलगाडी सजवून त्यामध्ये बसवुन घोड्यावरुन विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करुन केली यामुळे सर्व गुरुजन भारावून गेले.
या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी कृतज्ञता म्हणुन शिक्षणाच्या बदलत्या गरजा विचारात घेऊन विद्यालयास चाळीस हजार रुपये किमतीचा प्रोजेक्टर भेट दिला. तसेच विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना घेतला जाणारा परिपाठ व कवायत प्रकार घेऊन मुले वर्गात गेली. उशिरा येणाऱ्या मुलांना शिक्षा देऊन वर्गात घेतले व पुन्हा एकदा वर्ग भरवला. शालेय जीवनात घेतल्या जाणाऱ्या खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या व जिंकनार्या मुलांना बक्षिसे देण्यात आली. अतिशय आनंदी वातावरणात स्नेह मेळावा पार पडला या कार्यक्रमासाठी शिकून नोकरी व व्यवसाय करण्यास परराज्यात गेलेले विद्यार्थी सुद्धा आनंदाने उपस्थित झाले होते.


सर्व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही विद्यार्थी गरीब परिस्थितीशी झुंज देत आज उच्च पदावर,मोठे व्यवसाय करत आहेत यांनी भावुक होत आम्ही जे काही आहे ते या गुरुजनांनमुळे आहे याची कबुली दिली यामुळे शिक्षकांनाही गहीवरुन आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षिका प्रियांका रणसिंग व उपशिक्षक उत्तम रुपनवर सर यांनी व प्रास्ताविक रोहीणी कापसे आणि आभार भिवाजी कचरे यांनी मानले सुंदर रांगोळी सत्यम शितोळे यांनी काढली होती.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विनायक सुंबे,पर्यवेक्षक वाबळे सर,नामदेव खडके,भीमराव टकले,भरत शितोळे, दिपक खुडे,तात्या ढमाले, उदावंत मॅडम,लोळगे मॅडम त्यावेळचे सर्व शिक्षक,सेवक वर्ग व २००६ बॅचचे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन तानाजी चोरमले,संदिप भागवत,सुनिल शितोळे, गणेश चोरमले, तानाजी बरकडे,रामदास हांगे, दशरथ गुणवरे, अनिल आटोळे,सुजित फडके,रोहीणी कापसे,रेश्मा देवकर,प्रियंका रणसिंग व  उपशिक्षक उत्तम रुपनवर व सर्व २००६ बॅचचे माजी विद्यार्थी यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments