#Mumbai:नगरपंचायत हद्दीतील शासकीय जागेची मोजणी करा - राजकुमार हिवरकर पाटील
महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यातील असणाऱ्या चार नगरपंचायती मधील अकलूज, नातेपुते, माळशिरस, महाळुग या नगरपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अध्यादेश काढलेला आहे. चारही नगरपंचायतीमध्ये अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत सदर अर्जाच्या अनुषंगाने मोजणी करणे गरजेचे आहे. शासन निर्णयाप्रमाणे आपण २०११ पर्यंतच्या अतिक्रमण नियमानूसार करावे. आपण समितीचे अध्यक्षआहात तरी प्रकरण निहाय आवलोकन करून त्याचा अहवाल नगरपंचायतीकडे व अध्यक्ष असणारे उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्याकडे सादर करण्यात यावा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या विचाराने शासन आपल्या दारी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये अर्ज केलेल्या नागरिकांना त्यांची घरे नियमित करण्यासंदर्भात मोजणी होणे आवश्यक आहे
तरी सदर विषयानुसार तात्काळ मोजणी करण्यात यावी अशी मागणी माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी निवेदनाद्वारे उपसभापती निलम गोरे यांच्याकडे केली आहे .
प्रांत ,सचिव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, यांच्या बैठका घेऊन तात्काळ तालूक्यातील नागरीकांना घराचे सातबारे देण्याची कार्यवाही पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment