#Pune:धनगरवाड्यांच्या उन्नतीसाठी विकासनिधी उपलब्ध करून देणार- आ. शेखर निकम
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण तालुक्यातील पुणेस्थीत धनगर समाजाने पुणे कर्वे नगर या ठिकाणी दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला चिपळूण तालुक्यातील पुणे या ठिकाणी राहणा-या चाकरमान्यांनी भरभरून प्रतिसाद देत प्रचंड गर्दी करत कार्यक्रम यशस्वी केला.
चिपळूण तालुक्यातील धनगरवाड्यांच्या दुर्लक्षीत विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात यावा तसेच चिपळूण तालुक्यातील डोंगररांगांत राहणा-या धनगर बांधवांसी रस्ते आणि पाणी या मुलभूत गरजा पुर्ण कराव्यात या मागण्या प्रामुख्याने मांडण्यात आल्या त्यासाठी आमदार शेखर निकम यांनी राज्य सरकारच्या पातळींवर विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी या कार्यक्रमागरम्यान धनगर बांधवांकडून करण्यात आली तर पेढांबे, गाणे, खडपोली, शिरगांव , ओवळी, नांदीवसे, कुंभार्ली, कोळकेवाडी आदी वाड्यांसह इतर धनगरवाड्या दर्जेदार रस्त्यांनी जोडण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी या धनगरवाड्यांचा पाण्याचा प्रश्न ही निकाली काढून कायमस्वरुपी योजना करण्याची मागणीही करण्यात आली. मेळाव्या दरम्यान धनगर समाजाने केलेल्या मागणीला प्रतिसाद देत आमदार शेखर निकम यांनी ग्वाही देत चिपळूण तालुक्यातील धनगरवाड्यांसाठी निधी कमी पडू देणार नसून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आवश्यक निधीसाठी विशेष प्रयत्न करुन सर्व धनगरवाड्या रस्त्यांना जोडणार असून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ही विशेष पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही या कार्यक्रमात दिली.
चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात २०१९ ला सदानंद चव्हाण आणि शेखर निकम यांच्यात थेट लढत होवून आमदार शेखर निकम यांनी २९ हजार २९७ मतांनी विजय प्राप्त केला होता सध्याच्या घडीला आमदार शेखर निकम यांनी आपल्या आमदार पदाच्या कार्यकाळात अनेक वाड्या वस्त्या पिंजून काढत आपले नेटवर्क तयार केले असून विकास कामांप्रती आमदार शेखर निकम यांचा संवेदनशील पणा कामा येत आहे. त्यांच्या माध्यमातून चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामे होत असून धनगरवाड्यांच्या विकासासाठी ही निधी उपलब्ध करुन घेण्यात त्यांना यश आले आहे. पुढील टप्प्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून धनगरवाड्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन घेणार असल्याची ग्वाही दिल्याने धनगर समाजा बांधवांनी आमदार शेखर निकम यांना धन्यवाद देत त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
चिपळूण तालुका धनगर समाज मेळावा, पुणे आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण - संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, राष्ट्रवादी युवक तालुकाधक्ष निलेश कदम, खरी लोकजागृती चे संपादक संतोष येडगे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुरेश खरात, राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस अनंत कोकरे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रामचंद्र वरक, मिलन जंगम, परशूराम खरात, दत्ताराम बंगाल, सिकंदर चिपळूणकर, सुरेश गुरव, लक्ष्मण पवार, सिध्दार्थ निकम, महेश शिंदे, विलास खरात, नरेश हिरवे, प्रशांत येडगे, मधूकर जानकर, पांडूरंग खरात, अशोक बुरटे, मंगेश कोकरे, भगवान शिंदे, सुनिल कोकरे, रुपाजी गोरे, संतोष ( बाबू ) येडगे, संतोष वरक, प्रशांत येडगे, सुनिल येडगे, प्रकाश खरात, संतोष गोरे, राहूल शिंगाडे, बाबू खरात, काशीनाथ गोरे, दिपक कोकरे आदी आणि बहुसंख्य इतर समाजबांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment