#Mumbai:संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त डोंबिवली नाभिक संघटनेचे विविध कार्यक्रम संपन्न

पालखी दिंडी, कीर्तन सोहळा, नाभिक समाजातील मुलांसाठी वह्या वाटप व गुण  गौरव सोहळा व महाप्रसादाचे आयोजन


फोटो ओळ- बंधू चव्हाण-सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट
समन्वय- सलून ब्युटीपार्लर असोसिएशन ( महाराष्ट्र राज्य)

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
डोंबिवली  येथे सालाबादप्रमाणे यंदाही दि. ११ सप्टेंबर २०२३ सोमवारी संत सेना महाराज यांच्या ६५३ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ह. भ .प. हनुमंत तावरे महाराज यांच्या भजनी मंडळाने भजन सादर करून संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी व दिंडी काढण्यात आली .

तसेच ह भ .प. धनंजय अमळनेरकर महाराज यांचे कीर्तन व  त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेना सचिव दीपेशजी म्हात्रे समाजसेवक, प्रल्हादजी म्हात्रे, राष्ट्रीय नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष अरुणजी जाधव, सचिव  महेंद्र जाधव, सिने हेअर आर्टिस्ट बंधू चव्हाण , क्राईम बॉर्डर चे संपादक /ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वखरे व मान्यवरांच्या हस्ते समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच त्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

नाभिक समाज संघटना डोंबिवलीचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत, सचिव मंगेश पोफळे ,,उपाध्यक्ष रमेश वखरे ,सह-खजिनदार तुषार शिंदे,सह-सचिव अशोक अतकरे, विश्वस्त शिवाजी वैद्य ,संतोष आवटे, संतोष शर्मा, कृष्णा कारुडकर, दशरत चित्ते  उत्सव समिती सदस्य सोमीनाथ वरपे, महेश काशीद, संतोष खंडागळे,कृष्णा कदम आसाराम आतकरे, जवाहरलाल परमार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .

कार्यक्रमासाठी नाभिक समाज बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत