Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat:अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड यांच्याकडून नायब तहसीलदार यांना निवेदन


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका यांच्याकडून कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत अनुदान म्हणून जाहीर करावे.अशी अखिल भारतीय मराठा महासंघाची नायब तहसीलदार नरेंद्र शिंदे साहेब यांना निवेदनद्वारे मागणी.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका व शेजारील तालुक्यात सुद्धा पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे. शेत शिवारातील पिके करपली असून नदी,नाले,तलाव कोरडे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे सरासरीपेक्षा कमी प्रमाणामध्ये पाऊस पडल्याने व काही ठिकाणी न पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावलेली आहे.
त्यामुळे शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुक्याच्या वतीने करण्यात आहे अशी माहिती जिल्हा युवक अध्यक्ष मयूरआबा सोळसकर यांनी दिली.
    
दौंड तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सध्या शेतकरी हवालदिल आहे. दौंड तालुक्यामध्ये शेतीपुरक अनेक व्यवसाय चालतात यामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पण पाऊसाअभावी जनावरांना चारा टंचाई सुद्धा निर्माण झाली आहे.पावसाच्या आशेने सुरुवातीला कमी पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु पाऊस वेळेवर न पडल्यामुळे कर्जबाजारी होऊन बी बियाणे, खते खरेदी करून आज शेतकरी अडचणीत सापडला आहे.
वरील या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता राज्य सरकारने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार नरेंद्र शिंदे साहेब यांना निवेदन देताना अखिल भारतीय मराठा महासंघ युवक अध्यक्ष मयूर सोळसकर, जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष विशाल कुंजीर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज चोरगे,दौंड तालुका अध्यक्ष दिनेश गायकवाड, युवक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, शेतकरी अध्यक्ष विशाल राजवडे, खजिनदार प्रकाश तरटे, विद्यार्थी अध्यक्ष समीर लोहकरे, शेतकरी उपाध्यक्ष विकास टेमगिरे, युवक प्रसिद्धीप्रमुख गणेश दिवेकर,युवक उपाध्यक्ष प्रशांत ताडगे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दौंड पुरवठा विभाग अधिकारी प्रकाश भोंडवे यांची भेट घेऊन तालुक्यातील लोकांची रेशनकार्डची कामे शिबीर घेऊन करण्यात यावी अशीही मागणी केली.

Post a Comment

0 Comments