Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat:प्रवाशांची संख्या जास्त एस टी वाहतूकच्या फेऱ्या मात्र आहे त्याच !


महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
दौंड तालुक्यातील पुण्यापासून ४५ किमि अंतर असलेल्या यवत येथे एस टी ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची  संख्या  जास्त असल्याने एसटीच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय  होत आहे.


दौंड तालुक्यातील यवत येथे सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर, बार्शी ,करमाळा, जामखेड, राशीन, मोहोळ, अक्कलकोट,तुळजापूर, इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या लोकांची संख्या खूप असते यवत येथे रोज पुण्याहून एसटी  या मार्गावर धावत असतात. सर्व मार्गावर जाणाऱ्या बसमध्ये  यवत वरून सोलापूर ,अक्कलकोट, करमाळा, बार्शी, उमरगा, इंदापूर, भिगवन व इतर  जाणाऱ्या प्रवाशांची  संख्या जास्त असल्या कारणाने  यवत वरून  पुढे जाण्यासाठी एसटीत जागा नसते,महाराष्ट्र परिवहन महामंडळाची एसटी बस पुण्याहूनच पूर्णपणे प्रवासी भरून येत असतात  त्यामुळे त्या थांबतच नाही आणि थांबल्या तर त्या बस मध्ये जागा नसते त्यामुळे प्रवाशांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होते.

याबाबत स्वारगेट डेपोशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की सुरुवातीपासूनच स्वारगेट पासूनच या सर्व मार्गावरील फुल भरून जातात त्यामुळे पुढे ते एसटी चालक थांबू शकत नाही आणि प्रवाशांची संख्या जास्त झाली आणि बस मात्र अजून आहे तेवढेच आहे बस वाढवणे गरजेचे असताना शासनाने बस ची संख्या वाढवावी त्यामुळे आत्ता ज्यादा पास सोडल्या तरी त्यात जागा नसते  अजून बस उपलब्ध करून दिल्या तर सर्व सोयी होतील असे प्रवाशांचे म्हणणे आहे गाड्या खरेदी नसल्याने या समस्या निर्माण होतात तसेच लोक एसटीमध्ये लोकांची भरती पण नाही गाड्या कमी आणि लोकसंख्या ज्यादा झाली प्रवास करणारे लोक जादा झालेले आहेत असे स्वारगेट येथील वाहतूक नियंत्रण कक्षाचे यांचे म्हणणे आहे कारण आता ७५ वर्षांपुढील लोकांना पूर्णपणे एसटी प्रवासात सवलत आहे तसेच स्त्रियांना ५० टक्के तिकीट दरात सवलत आहे त्यामुळे सर्वच प्रवाशी एसटीकडे  वळला आहे एसटी ही सुरक्षित वाहन म्हणून पाहिले जाते. यवत इथून  शिक्षणासाठी २०० ते २५० मुलं वरवंडला शिक्षणाकरता जात असतात मोठे मुली एसटीने प्रवास करतात .शालेय विद्यार्थ्यांना व तिथून वरवंड शाळेतल्या जाण्यासाठी  एसटीत जागा नसल्यामुळे किंवा  एसटीत थांबत नसल्यामुळे गैरसोय होत असते. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस थांबत नाही तरी  प्रसनाने या भागातील बसची संख्या वाढावी.  तसेच विद्यार्थ्यांचे सुद्धा गैरसोय होऊ नये म्हणून एसटी च्या संख्या वाढवाव्या अशी मागणी  सर्व  स्तरातून  होत आहे.

Post a Comment

0 Comments