महादरबार न्यूज नेटवर्क - बारामती नगरपालिकेच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता हीच सेवा मानून चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बारामती नगरपालिकेच्या गणेश मार्केट येथील स्वच्छता केली. यामध्ये एकूण 50 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. बारामती नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषदा,पंचायत समिती, नगरपालिका,कटक मंडळे व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून स्वच्छता केली जाते. बारामती शहरातून या आवाहनाला प्रचंड मोठा प्रतिसाद देण्यात आला.
चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि यांचे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान असते. "याआधीही सामाजिक कार्य करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील होतो आणि भविष्यात देखील सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही उत्स्फूर्त सहभाग नोंदवणार असल्याचे मत या सुवर्णपेढीचे चेअरमन श्री. किशोरकुमार शहा यांनी सांगितले." या स्वच्छतेसाठी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे सर, सुरेश जोगदंड,सेल्स हेड दीपक वाबळे,एच आर कुलदीप जगताप, कुलदीप बावणे ,कुमार राठोड,रोहित आवदे यांचे मार्गदर्शन मिळाले.
या कार्यक्रमाचे नियोजन मार्केटिंग विभागाचे धनंजय माने,विनोद जगताप,सागर मदने,सचिन जाधव,सोनाली जगताप,प्रवीण काळे,रणजीत सावळे यांनी केले.
0 Comments