महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचा औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड त व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेवाडी व अंगणवाडी विद्यार्थी व शिक्षक तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती लहान मुले यांनी शाळेच्या सभोवताली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. हातात झाडू घेऊन सर्वच गावातील नागरी लोकांनी या मोहिमेत सहभागी झाले होते व संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
आजूबाजूचा सर्व कचरा गोळा करून पेटवून देण्यात आला. आपले परिसर व सोबत आलती शाळा गावातील वस्ती हे स्वच्छ करण्यात आले यातून एकच सामाजिक संदेश देण्यात आला की आपण स्वच्छता केल्याने आसपासचा परिसर सुंदर स्वच्छ होतो हे पटवून देण्यात आले. आपला परिसर व त्यांची करावी
त्यासाठी गावची सर्व नागरिक ते सर्व नागरिकांनी यात सहभागी झाले होते.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष समीर लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील जगताप, ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी लोहकरे,तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश जी गडदे,तानाजी ठोंबरे सर, म्हेत्रे मॅडम,माने मॅडम,छाया गुंड मॅडम,यशोदा नवसकर,सागर लोहकरे,तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments