महादरबार न्यूज नेटवर्क -
येथील डाॅ.बाळकृष्णाजयवंत दाते प्रशालेत 'आजी-आजोबा दिन हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी विविध खेळांच्या स्पर्धेत सहभागी होऊन नातवांसोबत आजी आजोबाही शाळेत रममाण झाले. अनेकांना आपल्या बालपणीचे दिवस आठवून 'लहानपण देगा देवा, मुंगी 'साखरेचा रवा' या अभंगातील ओळींचा खऱ्याअर्थाने प्रत्यय आला.
या शाळेत आजी- आजोबा दिन या नावीन्यपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रत्येक कुटुंबातील वयस्क आजी-आजोबांना शाळेमध्ये आमंत्रित केले होते. जवळपास १००-१५० वयस्कर व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होते. प्रारंभी त्यांचे स्वागत करण्यात आले.नंतर विद्यार्थ्यांनी आशीर्वाद घेतले. शाळेत लहान मुलांसाठी ज्याप्रमाणे विविध खेळांचे आयोजन केले जाते, त्याप्रमाणे आजी-आजोबांसाठी संगीत खुर्ची, बादलीत बाॅल टाकणे,लिंबू चमचा आदि खेळ येण्यात आले,
डाॅ.बा.ज.दाते प्रशालेत आयोजित आजी-आजोबा दिन उत्सवात सहभागी होऊन खेळ खेळताना विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा.बालपणाच्या आठवणीत रममाण झाले.
बादलीत चेंडू फेकणे, , चमचा लिंबू,संगीत खूर्ची, असे आनंददायी खेळ घेण्यात आले. या खेळात वयस्कर परंतु पोट धरून हसवले. अंगात कष्टाची रंग असलेल्या आजी- आजोबांनी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन खेळाचा आनंद लुटला. खेळाच्या स्पर्धेत * लिंबू चमचा श्रीमती वंदना बरडकर,रुस्तुम नदाफ,
बादलीत चेंडू टाकणे
नूरजहाँ नदाफ, अरविंद शेंडगे ,
संगीत खुर्ची —श्रीमती मंगल शंकर बंडगर , देवकाते दादा, हे विजयी ठरले.
याप्रसंगी प्रत्येक आजी-आजोबाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले. उपक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पिसे, पर्यवेक्षक दत्ताञय यादव,विनायक देशपांडे,मूकूंद परचंडे,आशा टोमके,निता मदने,सारीका जगताप,सिंधूबाईवाघमोडे,विकास काळे,सहकारी शिक्षक यांनी यांनी केले.
आयूष्याची साठवर्ष पार केल्यानंतर हट्टीपणा सोडून सर्व संसार प्रपंच मूलांचा,सूनेच्या हाती सोपवावा.आजी आजोबानी हट्टीपणा नाही सोडला तर घरातील वातावरणाचा लहान मूलांवर परीणाम होतो.मूलव सूनेकडे सर्व सोपवून आजी आजोबानी नातवंडाकडे लक्ष द्यावे.घरातील वातावरण चांगले रहाण्यासाठी संयम राखावा,हट्टीपणा सोडावा,व्यसनापासून आई,वडील,आजी आजोबानी दूर रहावे.सूनेने सासूला आईप्रमाने वागवावे,तर सासूने सूनेला मूली प्रमाणे वागवावे.
धैर्यशील देशमूख, चेअरमन,नातेपूते एज्यूकेशन सोसायटी.
धैर्यशील देशमूख, चेअरमन,नातेपूते एज्यूकेशन सोसायटी.
या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमूख,नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमूख,व्हा.चेअरमन संतोष काळे,सेक्रेटरी महेश शेटे .इ
आजच्या पिढीवर चांगले संस्कार होण्यासाठीॅ शिक्षक,पालकासोबतच कूंटूंबातील आजी आजोबाचा मोलाचा असा वाटा असतो.आजी आजोबा आणि नातवामध्ये असलेली नात्यांची वीण अधिक घट्ट होण्यासाठीअसे उपक्रम प्रेरणादायी आहे.
धनंजय देशमूख,गटशिक्षणाधिकारी माळशिरस.
आय
0 Comments