#Solapur:गांधीजींचे सत्य, अहिंसा व शांती चे तत्व जीवनात उतरवावे - अंकुश चव्हाण यांचे प्रतिपादन
केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे “गांधी विचार संवाद” कार्यक्रम
सोलापूर, दि. २ : राष्ट्रपिता गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढलेल्या लढाईत विरोधकांचा कधीही द्वेष केला नाही. त्यांच्या आंदोलनात हिंसा नसल्याने संपूर्ण विश्वाने त्यांना सामावलेले आहे. त्यामुळे महात्मा गांधीजी यांचे सत्य, अहिंसा व शांतीच्या तत्वांना जीवनामध्ये समाविष्ट करावे, असे प्रतिपादन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केले.

भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो यांच्या वतीने बोरामणी येथील ग्लोबल विलेज पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीनिमित “गांधी विचार संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री चव्हाण बोलत होते.
यावेळी वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. चंद्रकांत चव्हाण दिवंगत बी. एल. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिकेत चनशेट्टी, प्राध्यापक डॉ. धायगुडे, एचडीएफसी बँकेचे सीएसआर प्रमुख अंकुश आमले, हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. वैद्य, ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या असद नदाफ, उपप्राचार्य सोमनाथ स्वामी आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण आणि अनिकेत चनशेट्टी यांनी गांधीजीच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’ या गांधीजीच्या आवडत्या भजनाने करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार सारिका जगताप आणि प्रणिता जळकोट या विद्यार्थ्यांनी केले. गांधी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या घोषवाक्य व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. घोषवाक्य आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे- १) पूजा राहुल बामणकर, प्रियंका सुधाकर मस्के, पूनम कमलाकर भोसले, सारिका जगताप, प्रणिता जळकोट, साईराज भोसले, प्रेम राठोड आणि शुभम पाटील इत्यादी.
कार्यक्रमामध्ये शाळेतील इयता २ री वर्गातील यश बिराजदार या विद्यार्थ्याने गांधीजी यांची वेशभूषा परिधान केले होते. हेडगेवार ब्लड बँक आणि एच डी एफ सी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केंद्रीय संचार ब्यूरोचे कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, साईराज राऊळ आणि शाळेतील शिक्षक व कर्मचारी वृंद आदीनी परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment