Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat:म्हशीला आठ पाय, दोन शेपुट असे दोन पारडे एकमेकांना चिकटलेले व्यंग असे पारडू


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील टेळेवाडी येथील शेतकरी आप्पासाहेब आबासाहेब थोरात यांच्या म्हशीला आठ पाय, दोन  शेपुट असे दोन पारडे एकमेकांना  चिकटलेले व्यंग पारडू झाले असून या म्हशीची प्रसूती डॉ.बबनराव तेजनकर (निवृत्त पशुधन विकास अधिकारी )यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष किसन बडेकर( पशुधन पर्यवेक्षक) तसेच डॉ. शांताराम अंकुश वाघमोडे (पशुधन पर्यवेक्षक) यांनी खूप मेहनत घेऊन अतिशय क्लिष्ट व किचकट असणारी प्रसूती व्यवस्थितपणे पार पाडली या प्रसूती नंतर म्हशीची प्रकृती स्थिर आहे.म्हशीची प्रसूती झाल्यानंतर चिंताग्रस्त कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद चेहऱ्यावर दिसत होता. जनावरांवरही माणसांसारखे प्रेम करणारे शेतकरी कुटुंब आहे.

म्हैस सुखरूप दिसल्याचे पाहून घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
आत्ता च्या काळात जनावरांचे बाजार हे वाढलेले असून गरीब कुटुंबीयांना एक जनावर जरी दगावले तरी त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडून जाते.
अशा प्रकारचे व्यंग अनुवंशिक किंवा गुणसूत्रातील दोषांमुळे जन्माला येत असतात

Post a Comment

0 Comments