#Malshiras:लांडग्याला हुस्कवण्यासाठी हातात काठी घ्या - आमदार गोपीचंद पडळकर
महादरबार न्यूज नेटवर्क -
गेम चेंजिंग होईल या भीतीने समाजाला त्यांच्या हक्कापासून जाणून-बुजून दूर ठेवण्याचे कपटी कारस्थान यापूर्वी प्रस्थापितांनी केले. धनगर आणि धनगड यातील "र" व "ड" च्या खेळात समाजाला अडकवण्याचे काम केले. त्यामुळे इथून पुढे समाजाने प्रस्थापितांच्या षडयंत्राला बळी न पडता आरक्षणाच्या आड येणाऱ्या लबाड लांडग्यासाठी काठी हातात घेऊन आपली धनगरी ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. अशी गर्जना आमदार गोपीचंद पडळकर यांनी विझोरी तालुका माळशिरस येथील जाहीर सभेत केली.
धनगर समाजाची एस.टी. आरक्षण अंमलबजावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या धनगर जागर यात्रेची सुरुवात विझोरी तालुका माळशिरस झाली. त्यावेळी आयोजित जाहीर सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर समाज बांधवांना मार्गदर्शन करत होते.यावेळी माळशिरस , सांगोला , पंढरपूर तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पडळकर यांनी धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम प्रस्थापितांनी केल्याचा आरोप करीत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला व चौफेर टीकास्त्र डागले. आ.पडळकर म्हणाले की ,राज्यात धनगड ही जात अस्तित्वात नसताना देखील 1981 मध्ये शरद पवार यांनी गडचिरोलीमध्ये एक धनगर असल्याचा शोध लावला. या देशांमध्ये धनगर समाजावर सर्वात जास्त अन्याय झाला आहे. समाजाला शैक्षणिक ,सामाजिक व आर्थिक विकासापासून रोखून ठेवण्याचे काम प्रस्थापितांनी केले. धनगर समाज मोठा असूनही गुलामगिरीतच जीवन जगत आहे .समाजाला दुय्यम स्थान आहे. धनगर समाजा चे एस.टी .आरक्षण न्यायप्रविष्ठ आहे. दिनांक आठ डिसेंबर 11 डिसेंबर व १५ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायालयीन लढाई पूर्ण ताकदीने चालूच आहे. त्यामध्येही काही अडचण आलीच तर सकल
धनगर समाजाने रस्त्यावरील लढायला तयार राहण्याचे आवाहन ही आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित जनसमुदायाला केले .
आ.पडळकर म्हणतात...
लांडग्यांना धनगरी ताकद दाखवा, काठी हातात घ्या
धनगर ही राजकर्ती जमात होऊ शकते .सर्वांनी एक जुटीने नोकरी सत्तेत आपल्या हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी दबाव गट तयार करायला हवा .असे झाले तरच जमात भविष्यात अग्रस्थानी असेल. मिळालेले एन.टी आरक्षण म्हणजे धनगर समाजाचा घात असून त्यामुळे एस.टी आरक्षण हे मिळणे गरजेचे आहे आणि ते लवकरच मिळेल या हक्काच्या आरक्षणा आड एखादा लबाड लांडगा येत असेल तर त्याला हातात काठी घेऊन धनगरी ताकद दाखवा.
Comments
Post a Comment