#Yavat:आदर्शवत विवाह सोहळा शेलार व सोनवणे कुटुंबाचा


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
विवाह प्रसंगी महागड्या वस्तू आणी भांडी मुलीस भेट देण्याऐवजी दोन्ही कुटुंबाचे आदर्श असलेले थोर सामाजिक समाज सुधारक यांची पुस्तके  आणी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व प्रतिमा भेट दिल्या. आदर्शवत उदाहरण असल्याचे मत दौंडच्या माजी आमदार रंजना कुल यांनी वधूवरास शुभेच्छा देताना व्यक्त केले आहे.
जेष्ठ पत्रकार एम. जी. शेलार यांचा नातू पृथ्वीराज आणी जितेंद्र सोनवणे यांची कन्या साक्षी यांचा विवाह सोहळा यवत येथे पार पडला.

विशेष बाब यावेळी मुलीस उंची फर्निचर, कपाटे, फ्रीज, भांडी ऐवजी थोर सामाजिक समाज सुधारकांची चरित्र, भगवान बुद्ध यांचे विषयी पुस्तके, शाहू, फुले, आंबेडकर याचेवरिक  सर्व चरित्र आणी वांगमय, भगवान बुद्ध आणी आंबेडकर यांचे धातूचे अर्ध पुतळे भेट देण्यात आले.
उपस्थित लोकांना हे पाहिल्यावर पुस्तक प्रदर्शन वाटले, परंतु झाली ऐवजी पुस्तके, प्रतिमा आणी पुतळे भेट दिल्याचे पाहून उपस्थितनी प्रशसा केली.
कुल पुढे म्हणाल्या, एम. जी. दीर्घाकाल सरळ मार्गी आणी चांगली पत्रकारिता करीत आहेत, सोनवणे हेही चळवळीतील कार्यक्रयते आहेत. त्यांचा हा उपक्रम आदर्श आणी दखल घेण्यासारखा आहे. मी त्यांचे अभिनंदन करीत आहेत.
यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष सुनील लोणकर,  रयत शेतकरी संघटनेचे सस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, दौंड, पुरंदर हवेली तील पत्रकार आणी हितचिंतक उपस्थित होते,

आगळी वेगळी परंतु  आदर्शवत झाल -- विवाह समारंभात  मुलीस महागडे फर्निचर, फ्रीज, कपाटे, दिवाण, कोचं भांडी, टीव्ही, गॅस यासह उंची वस्तू देणे हा सन्मान व मोठेपणा मान्यन्यात येत असते.
परंतु येथे विविध पुस्तके, समाज सुधारकांच्या प्रतिमा, चरित्र, शाहू, फुले आंबेडकर अर्ध पुतळे हे सर्व आगळे वेगळे पाहून उपस्थितानी प्रसंशा केली आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत