#Natepute:शिवसेनेच्या वतीने दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नातेपुते येथे चनाडाळीचे वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क -
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि नाफेडतर्फे साठ रुपये किलो दराने नागरिकांसाठी दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारत डाळच्या नावाने चणाडाळ विक्री माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कार्यसम्राट आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत , तसेच सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या नेतृत्वात माळशिरस तालुक्यातील तमाम जनतेस आज दिनांक १७/१०/२०२३ रोजी भारत सरकार ग्राहक व्यवहार विभाग आणि  नाफेडतर्फे 60 रुपये  किलो या दराने चणाडाळ विक्री करण्यात आली. यावेळी उद्घाटन प्रसंगी नातेपुते नगरीचे रावसाहेब पांढरे होते.
राजकुमार हिवरकर पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यासाठी नातेपुते नगरीमध्ये नऊ टन चना डाळ विक्री करण्यात येणार आहे.  त्यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी वर्षा या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती त्यामध्ये मला समजले की  महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड साजरी करण्याचे काम भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र  मोदी तसेच महाराष्ट्राचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी ठरवले आहे.त्यासाठी चणाडाळ आपण दिवाळीसाठी वाटप करणार आहोत  त्यामध्ये राजकुमार हिवरकर पाटील यांनी चणाडाळ आपल्या तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत सामान्य माणसापर्यंत कशी  पोहोचेल यासाठी त्यांनी शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले व त्याच्या या प्रयत्नांना यश मिळाले व  माळशिरस तालुक्यासाठी नऊ टन चणाडाळ विक्रीसाठी मिळाली.  व ती डाळ 60 रु प्रति किलो दराने महिलांना प्रति आधारकार्ड वर 5 किलो या दराप्रमाणे नातेपुते येथील शिवसेना भवन येथे वाटप करण्यात आले.

राजकुमार हिवरकर पाटील यांनी  पुढे बोलताना सांगितले की आपण माळशिरस तालुक्यासाठी नातेपुते नगरीसाठी ज्या ज्या गोष्टी कार्यसम्राट आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत तसेच प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांना मागितल्या त्या त्यांनी वेळोवेळी आपल्याला दिलेले आहेत. नातेपुते येथे शंभर खटांचे महिला हॉस्पिटल मंजूर करण्यात आले त्याबद्दल ही त्यांचेही आभार मानले.

यावेळी रावसाहेब पांढरे, नितीन कोरडकर ,उपप्रमुख तालुका दादासाहेब मुलानी, गटनेते सतीश आप्पा बरडकर, नातेपुते भाजपचे सुनील बनकर ,भाजपाचे युवा नेते मनोज जाधव, प्रभाग क्रमांक सात चे अध्यक्ष सनी बरडकर, नातेपुते शहर प्रमुख पोपटरावजी शिंदे , कामगार संघटना अध्यक्ष राजू जाधव, सचिव माऊली देशमुख, दहीगाव गटप्रमुख प्रमोद चिकणे , जावेद सर, राजू मुलांनी सर तसेच शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बचत गटातील महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम