#Chiplun:चिपळूण तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम क्रमांक


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळ आणि चिपळूण तालुका गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेसाठी चिपळूण तालुक्यातील 28 संघ सहभागी झाले होते. त्यामधून अत्यंत चुरशीच्या स्पर्धेमध्ये एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलच्या अपूर्व आनंद बुरटे आणि शार्दुल तुषार शिंदे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला व त्यांची जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषेसाठी निवड झाली. सदर स्पर्धेत गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या ऋषिकेश मंदार लेले आणि चैतन्य मिलिंद साल्ये यांनी द्वितीय क्रमांक आणि मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूल खेर्डीच्या आर्या अभिजीत बर्वे आणि आदित्य सचिन राजेशिर्के यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

त्याचप्रमाणे देवखेरकी हायस्कूलच्या ऋग्वेद मंगेश अलीम आणि सुजल सुरेश हळदे आणि मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय अलोरेच्या सई संजय बेर्डे आणि भूमि नितीन कोलगे या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या स्पर्धेच्या शानदार पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी चिपळूणच्या किंगमेकर ग्रुपचे आधारस्तंभ, नव कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक आणि चिपळूण अर्बन बँकेचे माजी व्हॉइस चेअरमन डॉक्टर दीपक विखारे तसेच उद्योजक श्री. अमजद मुकादम  आणि युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील मॅडम पर्यवेक्षक श्री. मुंडेकर सर, गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या पर्यवेक्षिका येसादे मॅडम, पाध्ये मॅडम आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित  होते. चिपळूण तालुका गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष  बिराप्पा मोटगी, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव ज्ञानेश्वर नाझरे किशोर कित्तूर सर्व कार्यकारणी सदस्य आणि गणित शिक्षक यांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवर आणि विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात आले. सुरुवातीला संपूर्ण स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर गुणाानुक्रमे 5 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी किंग मेकर ग्रुप चिपळूण यांनी प्रायोजकत्व दिले होते. सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष अमोल टाकळे यांनी केले. तसेच जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल चिपळूण तालुका गणित अध्यापक मंडळाचे विशेष अभिनंदन केले आणि स्पर्धेला प्रायोजकत्व देणाऱ्या किंगमेकर ग्रुपचेही विशेष आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत