#Natepute:पिंपरी गावच्या लोणारबाबा राणबा देव यात्रेला महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख ची कुस्ती व रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा
महादरबार न्यूज नेटवर्क -
सालाबादप्रमाणे याही वर्षी पिंपरी गावचे समाजाचे जागृत देवस्थान लोणारबाबा व राणबादेव यांची यात्रा या वर्षी २७ तारखेला गोडवा नैवद्य २८ तारखेला बकरी व मनोरंजना साठी महाराष्ट्रातील नामांकीत विनोदाचा बादशहा मास्टर रघूविर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा रात्री ८ वा तसेच २९ तारखेला कुस्त्यांचे जंगी भव्य मैदान घेण्यात येणार आहे.
या मैदानाचे खास आर्कषण यंदाचा महाराष्ट्र केसरी सोलापुर जिल्याचा सुपुत्र पै सिंकदर शेख ची लढत ३ लाख रुपये इनामा वर होणार आहे तसेच या मैदाना साठी प्रमुख पाहुणे लोणारी समाजाचे पहीले आमदार मा श्री रविंद्र भाऊ धंगेकर साहेब व लोणारी समाजाचे प्रथम महाराष्ट्र केसरी करमाळा पंचायत समीतीचे माजी सभापती पै चंद्रहास बापु निमगीरे हे ही उपस्थीत रहाणार आहेत १०० रू ते ३००० रु पर्यंतच्या सर्व कुस्त्या त्याच दिवसी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत मैदाना मध्येच जोडण्यात येणार आहेत व अंतीम निर्णय पंचाचा राहील याची सर्व पैलवान लोकांनी नोंद घ्यावी ही समस्थ ग्रामस्थ यांच्या कडून विनंती व आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे.
लेकीच्या हाकेला व भक्ताच्या भक्तीला पावणार हे लोणरी समाजाचे जागृत देवस्थान आहे महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून लोणरी समाज बांधवा बरोबर लाखो भाविक या यात्रेचा आनंद घेत असतात
Comments
Post a Comment