#Malshiras:पिलीव येथील "आठवणी ९५" या माजी विदयार्थी सामाजिक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नितीन शिंदे यांची निवड


महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील  पिलीव येथील  आठवणी  ९५  या माजी  विदयार्थी  सामाजिक  संघटनेच्या  अध्यक्षपदी पत्रकार  संजय पाटील  यांची तर उपाध्यक्षपदी  नितीन  शिंदे  व सचिव पदी सचिन  गाटे यांची सर्वानुमते  बिनविरोध निवड करण्यात आली. आठवणी  ९५ ही  माजी विदयार्थीनची गेल्या  अनेक  वर्षापासून  सामाजिक  क्षेत्रात  कार्यरत असणारी सामाजिक संघटना आहे .या संघटनेमार्फत  विविध  सामाजिक  उपक्रम, गोरगरीब विदयार्थीना  मदत,आरोग्यविषयक  मार्गदर्शन  ,शैक्षणिक  क्षेत्रात   येणाऱ्या  अडी अडचणी  सोडविणे असे अनेक  सामाजिक  उपक्रम  राबविले जातात.

यावेळी  माजी अध्यक्ष  उमेश  देशमुख  यांच्या  हस्ते  नुतन अध्यक्ष  संजय पाटील  यांचा तर माजी उपाध्यक्ष  अविनाश  जेऊरकर  यांच्या  हस्ते  नुतन उपाध्यक्ष  नितीन  शिंदे  तसेच  सचिन  गाटे यांचा सत्कार करण्यात आला. हया वर्षी  गोल्डन  महीला  म्हणून  सत्यभामा मदने यांचा साडी देऊन  तर गोल्डन  पुरुष म्हणून  सुर्यकांत  मदने यांना  मानाचा फेटा देणयात आला.

या मेळाव्याप्रसंगी  डॉ    स्मिताराणी पाटील, राणी महामुनी,अनिता जगदाळे ,सत्यभामा  मदने, गुजरे,देशमुख, डॉ विलास  जाधव, डॉ भागवत जाधव, संतोष  मदने,उमेश देशमुख, अविनाश  जेऊरकर, जयंत गोरे,योगेश विरकर संग्राम पाटील , प्रदीप वगरे,विशाल  शिर्के, ईस्माईल पठाण,गुरूदेव पंडीत,सुर्यकांत  मदने,यावेळी    सुत्रसंचालन  सचिन गाटे सर यांनि  केले तर आभार  नुतन अध्यक्ष  संजय पाटील  यांनी मानले.         

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम