महादरबार न्यूज नेटवर्क - सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव ज्ञानेश्वर लोंढे यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या तिसऱ्या दिवशीच्या जलदान विधीवेळी शेतामध्ये वृक्षारोपण करुन त्यांचे रक्षा विसर्जन करण्यात आले.त्याबरोबर आईच्या स्मृतीप्रीत्यर्थही आंब्याचे झाड लावण्यात आले.
सध्या वृक्षारोपण ही काळाची गरज असुन पाणी दूषित होऊ नये याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.ही गरज ओळखूनच सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव ज्ञानेश्वर लोंढे (वय ८३)यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांचा अंत्यविधीनंतर तिसऱ्या दिवशी जलदान कार्यक्रमानिमित्त त्यांची मुले आनंदकुमार लोंढे,शशिकांत लोंढे व मुलगी जयश्री सोनवणे,सुन पल्लवी लोंढे ,वंदना लोंढे यांनी तोंडले ता.माळशिरस येथील शेतामध्ये सदाशिव लोंढे यांचे अस्थि व रक्षा आंब्याची रोपे लावून त्याखाली विसर्जन करण्यात आले.मागील वर्षी शांताबाई सदाशिव लोंढे यांचेही निधन झाले होते.या दोघा आई वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलांनी आंब्याची रोपे लावून वृक्षारोपणाचा संदेश दिला.
0 Comments