#Mumbai:जि.प. गट धामापूर तर्फे संगमेश्वर गटातील मेळावा मुंबईस्थित नागरिकांचा मेळावा उत्साहात संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण संगमेश्वर आमदार शेखर निकम यांनी आमदार झाल्यानंतर मागील चार वर्षात केलली विकास कामे जनतेपर्यंत पोहचली की नाही तसेच मतदार संघातील उर्वरीत विकास टप्पा टप्प्याने कसा करता येईल हे आपल्या गावाप्रति प्रेम करणा-या चाकरमान्यांकडून जाणून घेण्यासाठी व योग्य मार्गदर्शन व सर्व चाकरमान्यांची सदिच्छा भेट व्हावी यासाठी जिल्हा परिषद गटाप्रमाणे मेळाव्याचे आयोजन आमदार शेखर निकम यांनी त्या त्या गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने केले आहे.


त्याप्रमाणे जि.प. गट ओझरे, जि.प. कडवई व मुचरी पं.स. गण याचे मुंबईस्थित चाकरमान्यांचे मेळावे अलोट गर्दीने यशस्वीरीत्या पार पडले. मात्र कालच झालेला जि.प.धामापूर तर्फे संगमेश्वर गटाचा मेळावा हा विश्व करंडक भारत व ऑस्ट्रोलिया फायनलच्या दिवशी असल्याने याला गर्दी होईल की नाही यामध्ये संभ्रम चिपळूण संगमेश्वर मतदार संघातील जनतेत होताच तेवढाच या मेळाव्यात किती लोक हजेरी लावतात याकडे सर्व विरोधकांमधील  नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे लक्ष लागून राहिले होते.

परंतु कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी आमदार झाल्यापासून केलेली नियोजनबद्ध कामे, प्रत्येक गावातील वाडी-वस्त्यांमधील केलेला विकास तसेच धामापूर जि.प. गटात विविध योजनेंतर्गत 69 कोटी 04 लाख 70 हजाराचा निधी मंजूर केला आहे. शांत, संयमी स्वभावाचे असलेले शेखर सर यांच्या हाकेला हाक देत देश कि धडकन असलेला विश्व करंडक भारत व ऑस्ट्रोलिया फायनल सामना न पहाता सरळ मतदार संघातील जि.प. धामापूर तर्फे संगमेश्वर गटतील लोकांनी मेळाव्यास गर्दी करुन मेळावा यशस्वीरीत्या पार पाडला.


आमदार शेखर निकम यांनी सर्व उपस्थित लोकांचे आभार मानले. मार्गदर्शन करताना म्हणाले विश्व करंडकाची फायनल असुन सुद्धा धामापूर तर्फे संगमेश्वर जि.प. गटातील मुंबईस्थित चाकरमान्यांनी मेळाव्यास केलेली गर्दी अभिमानास्पद असून मला भविष्यातील कामगीरीला पाठबळ देणारी ठरेल. आपलं सर्वांचे प्रेम असेच वृद्धिंगत होवो. तुमच्या मिळणा-या प्रेमाने व पाठिब्यांने मी निश्चितच टिकाकारांना मतदार संघाचा विकास करत सडेतोड उत्तर देवू शकेन. आपण आप-आपसात वाद विवाद न करता पक्ष वाढीच्या दृष्टीने काम करत रहा. आपल्या गटातील उर्वरीत कामे निश्चितच पुढील काळात केली जातील असा विश्वास देतो आणि आणि आपण माझ्या हाकेला तुम्ही दाद दिलीत त्याबद्दल आपल्या सामोर नतमस्तक होतो.


यावेळी जयंत खताते, अजित यशवंतराव, बाबाजीराव जाधव, दादा साळवी, रमेश राणे, सुरेश घडशी , अबु ठसाळे, रमेश राणे, पूजा निकम, राजेंद्र सुर्वे, राजेंद्र पोमेंडकर, बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, जाकीर शेकासन, सुदेश घडशी, प्रफुल्ल भुवड, अविनाश कांबळे, नितीन भोसले, मंगेश बांडागळे, बाळ पंदेरे, सरपंच प्रकाश वीर (मावळंगे), महेश बाष्ट्ये (माखजन), कृष्णा जोगळे (नारडुवे), शेखर उकार्डे (आंबव), शांताराम भायजे (धामापुर), निधी पंदेरे (वांझोळे), मुंबईस्थित प्रमुख कार्यकर्ते उमेश पवार, प्रभाकर धनावडे, अनिल मेंडे, संदिप जड्यार, प्रकाश चव्हाण, राजाराम मोरे, सिताराम बाचिम, सुनिल वेलोंडे, भुषण वीरकर, तुकाराम गोताड, शरद चव्हाण, अशोक मांडवकर, शिवाजी धनावडे, सिद्धार्थ पवार, संदिप पड्यार, भाई सावंत, अनंत गोटेकर, मोहन भुवड, वसंत भुवड, प्रथमेश मेणे, ॲड.मोहीते, भिमराव गमरे, अमरसेन भुवड, ज्ञानदेव पड्यार, योगेश साटले, उमेश कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच सुशिल भायजे,सुरेश घडशी, नाना कांगणे, शेखर उकार्डे, गणपत चव्हाण, अक्षय चव्हाण, मयुर बाष्ट्ये, गजानन सुर्वे, रुपेश गोताड, शशिकांत घाणेकर, बाबुकवळकर, सुबोध चव्हाण, शैलेश चव्हाण, अमित माचिवले, प्रकाश जड्यार, कृष्णा जोगळे, रमाकांत घाणेकर, लवु सुर्वे, सुभाष महाडीक, एम आर कांबळे, पांड्या पड्ये, भैया शिगवण, सिद्धार्थ पवार, अजीज आलेकर, संतोष गोटेकर, समीर लोटणकर, सुलतान कापडी, विजय जोगळे, बंड्या किंजळकर, अनंत नवरंग, सुरज जोगले यांनी व धामापुर जि.प. गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नियोजनाने मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.

माझ्यात हवा कोणती भरली आहे याची शक्कल लढवणा-यांनी मतदारसंघातील जनतेच्या हृदयात माझ्याबद्दल प्रेम का निर्माण झाले आहे याचा विचार करावा जनतेच्या मिळणा-या पाठबळामुळे मी धन्य झालो – आ. शेखर निकम

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम