#Yavat:यवत येथील उजव्या डाव्या कालव्यात घाणीचे साम्राज्य
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
पुणे येथून येणाऱ्या उजव्या डावा कालवा यवत येथून जातो उजवा हा कालवा पुढे जातो ह्या कालव्यातून शेतीपाण्यसाठी पाणी खडकवासला धरणातून व इतर तीन धरणातून सोडले जाते या धरणातून येणारे पाणी हवेली दौंड यात व इंदापूर या तालुक्यातला पुरवले जाते या धरणाच्या पाण्यामुळे शेतीला,पिण्याच्याचे पाण्यासाठी तलावात सोडून त्याशेजारी विहिरी आहेत त्या विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा वापर होतो .
हवेली ,दौंड ,इंदापूर येथील गावचा पाण्याचा बऱ्याच अंशी प्रश्न सुटलेला आहे.या कालव्याचे पाणी आत्ता पंधरा दिवसा पासून येण्याचे बंद झालेले असताना या कालव्यात लोकानी टाकलेले बरेचसे प्लास्टिक ,हार कचरा हे यवत येथील पुणे सोलापूर रोडवरील असलेल्या कालव्यात बराच कचऱ्याचे थवे दिसून येत आहे या घाणीमुळे प्रदूषण वाढण्यास मदत होते, कालव्याचे पाणी पुढे जाण्यास विलंब होत आहे असलेला कचरा व प्लास्टिक खराब हार फुले टाकले जातात त्यामुळे पाणी खराब होते संबंधित प्रशासनाने टाकणाऱ्या टाकण्यास मज्जाव करावा अशी नागरिकातून मागणी होत आहे. तसेच या पाणी माटोबा तलावाच्या शेजारी बऱ्याच गावाच्या विहिरी असून पिण्यासही वापरतात त्यामुळे काय अंशी आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सुद्धा व कालव्यात काही कचरा किंवा घाण टाकू नये अशी मागणी नागरिकातून होत आहे.
Comments
Post a Comment