Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat:सन सिटी (धायरीत) साकारला नळदुर्ग किल्ला


महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
दिवाळीत घरोघरी किल्ले करण्याची फार जुनी प्रथा आहे पण एखाद्या सोसायटीत संपूर्ण सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याची अनोखी प्रथा येथील सनसिटी येथे गेली अनेक वर्ष सातत्याने सुरू आहे हे या सोसायटीचे मुख्य वैशिष्ट्य.


यावर्षी सोसायटी  रहिवाशांनी नळदुर्ग या भुईकट किल्ल्याची प्रतिकृती सादर केली. सोसायटीतील  तरुण वर्ग ज्या किल्ल्याची प्रतिकृती करावयाची त्या किल्ल्याला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील किल्ल्याची संपूर्ण माहिती, इतिहास किल्ल्याचे फोटो, चित्रीकरण करतात व त्याप्रमाणे हुबेहूब तो किल्ला उभा करण्याचा प्रयत्न करतात हे आणखी एक वैशिष्ट्य.


सोलापूरला प्राध्यापक असताना अनेकदा विद्यार्थ्यांच्या सहलीसोबत नळदुर्ग किल्ल्याला भेट देण्याचा योग आला .
सन सिटीतील सर्व सभासद आबाल वृद्ध हा किल्ला तयार करण्यासाठी स्वेच्छेने अहोरात्र मेहनत घेतात. गेले पंधरा दिवस सोसायटीतील सर्व तरुण व तरुणी रात्र-रात्र जागून ही कलाकृती सादर करण्यासाठी झटत  असताना पाहिले. अगदी पाच वर्षाच्या बालकापासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी आपले योगदान दिले आहे.


हा किल्ला सादर करण्यासाठी सोसायटीतील सर्वचे विशेषतः स्थापत्य अभियंते,संगणकतज्ञ, माहिती क्षेत्रातील तज्ञ, इतिहास अभ्यासक,विद्युत अभियंते* या सारखे तज्ञ आपल्या अनमोल वेळ देऊन देत असताना पाहिले. त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन किल्ल्याची ही प्रतिकृती हुबेहूब जशीच्या तशी उभी करण्याचा प्रयत्न झाला आहे. .
नयनरम्य उद्घाटन सोहळा
दिवाळी अगोदर किल्ल्याची ही प्रतिकृती तयार करून प्रत्यक्ष दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेच्या मुहूर्तावर सायंकाळी  मान्यवरांच्या हस्ते या किल्ल्याचे उद्घाटन सोहळा आयोजित करणाऱ्यात संयोजकांची दृष्टी व कुशलता दिसून येते. हा सोहळा अधिक नेत्र दीपक असावा असा संयोजकांचा प्रयत्न असतो.

सोसायटीत किल्ला तयार करण्याच्या निमित्ताने सोसायटीतील सर्व सभासदांना एकत्रित करण्याचे, सहकार्याने कार्य करण्याचे व सहभागाची भावना निर्माण  करण्याचे कार्य येथील युवावर्ग करतो हे महत्त्वाचे. त्यांच्या आवाहनाला सोसायटीतील सर्व रहिवासी स्वेच्छेने प्रतिसाद देतात हे सोसायटीचे वैशिष्ट्य. त्यासाठी सोसायटीचा उपाध्यक्ष व उत्साही युवा कार्यकर्ता समीर रुपदे व त्याचे सर्व सहकारी मित्र अभिनंदनास पात्र आहेत. सोसायटीतील सर्व रहिवाशांचे हे ऐक्य, एकता व सहकार्य असेच अखंडित राहो ही  सदिच्छा. किल्ला  निर्मितीत ज्यांचे सहकार्य लाभले त्याचे आभार सर्वांचे व अभिनंदन प्राध्यापक रमेश गोपाळ देशपांडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments