#Yavat:श्री काळभैरव जन्मोत्सव सोहळ्याचे यवतमध्ये आयोजन
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदीरात (दि२९) पासून श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळाची सुरुवात श्री काळभैरव मंदिरात होणार आहे. यामध्ये जन्माष्टमी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन असे कार्यक्रम होणार आहे .व्यासपीठ चालक ह भ प शंकर महाराज उंडे आळंदी हे राहणार आहेत किर्तन रोज सायंकाळी ९ ते ११या वेळेत होणार आहेत. यामध्ये दि २९ रोजी ह भ प शामसुंदर ढवळे हिंगणी बेरडी यांचे किर्तन होणार आहे दि३० ला ह. भ .प. पोपट महाराज पाटील कासार खेडेकर खानदेश दि१ रोजी ह. भ. प. आदिनाथ महाराज लाड आळंदी दि २ रोजी ह .भ. प. सुधाकर महाराज वाघ पैठण दि ३ रोजी ह. भ .प. वैजनाथ महाराज थोरात हिंगोली दि ४ ला ह. भ. प. गंगाराम महाराज राऊत पैठण दि ५ ला दुपारी चार ते सहा वेळेत भव्य दिंडी सोहळा होणार आहे ह. भ. प. माधव महाराज राऊत बीड यांचे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव किर्तन रात्री दहा ते बारा या वेळेत होणार आहे(दि ६) रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत ह. भ. प. प्रकाश महाराज साठे यांचा काल्याचे किर्तन होणार आहे तरी यवत्व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामस्थना करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment