#Chiplun:माखजन गावातील विविध विकास कामांचे भूमिपुजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील मौजे माखजन गावात आमदार शेखर निकम यांनी शासनाच्या विविध योजनांतर्गत उपलबद्ध करून दिलेल्या विकास निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांचे भूमिपुजन आमदार शेखर निकम व मान्यवर ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आला. माखजन गावासाठी गणेश विसर्जन घाट व जेटी बांधणे, बाजारपेठ रस्ता काँक्रिटिकरण करणे, मोहल्ला कब्रस्तानला संरक्षक भिंत बांधणे, त्यासोबतच रांजणेवाडी, कबुतर मोहल्ला व राधाकृष्ण मंदिर रस्ता डांबरीकरण करणे होणे आवश्यक असल्याने ग्रामस्थांनी त्याबद्दलची मागणी आमदार शेखर निकम यांचेकडे केली. ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देवून विविध फंडातून निधी या विकास कामांसाठी दिला. यापुढेही माखजन गावातील विकासासाठी आपण प्रयत्नशिल राहून अधिकाधीक विकासात्मक कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे प्रतिपादन आमदार निकम यांनी केले.

यावेळी सरपंच महेश बाष्टे, उपसरपंच पुजा डेरे, राजेंद्र सुर्वे, राजेंद्र पोमेंडकर, प्रकाश रेडीज, अजिज आलेकर, शेर आलम खोत, शैलेश धामणस्कर, हनिफ म्हाते, जाकिर शेखासन, शेखर उकार्डे, गणपत चव्हाण, सुशिल भायजे, रमाकांत घाणेकर, शशिकांत घाणेकर, नाना कांगणे, दिपक जाधव, मूल पिरधनकर,विशाल रांजणे तंटामुक्त अध्यक्ष,  किशोर तांबटे, सुबोध चव्हाण, कांता धामणकर,में राज खोत, विलास कदम, निता चव्हाण,  गौतम कदम, वैष्णवी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य , अशरफ मुकादम विशेष कार्यकारी अधिकारी, सिद्धार्थ पवार, संतोष गोटेकर, रुपेश गोताड, निसार मुल्ला , भाई मोरे,नितीन सांगवेकर ,अनिल जाधव व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम