#Chiplun:राधाकृष्णनगर पाटगाव पागारवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत (अजित पवार गट) जाहीर पक्ष प्रवेश

मतदार संघातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ माझ्या कुटुंबासमान- आ. शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव, राधाकृष्ण नगर पागारवाडीतील ग्रामस्थांनी जनसंपर्क कार्यालय, सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांची भेट घेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला.

चिपळूण संगमेश्वर मतदार संघात गेले काही दिवस राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा ओघ सुरु आहे. आमदार शेखर निकम यांची नियोजनबद्ध कामाची पद्धत, विकास कामांचे दिलेले शब्द लिलया पेलण्याचे कसब, अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न मांडून त्याचा पाठपुराव करुन मार्गी लावण्याची कला, संयमी अशा नेतृत्वाने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत लोकांच्या मना मनात मानाचे स्थान मिळवले आहे आणि त्यामुळेच जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहे.

आमदार शेखर निकम यांची मागील झालेल्या देवरुख दौ-यावेळी राधाकृष्ण नगर पागारवाडीतील ग्रामस्थांनी भेट घेतली यावेळी वाडीतील असलेल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या त्यामधील वाडीतील रस्ते, वाडीची सार्वजनिक पार, सभामंडप हा आपल्या माध्यमातून व्हावा, असा ग्रामस्थांनी आग्रह धरला यावेळी आमदार शेखर निकम यांनी क्षणाचा विलंब न लावता त्या कामास शब्द दिला काम पूर्ण करुन दिली.
तसेच मौजे पाटगाव मेनरोड ते पागारवाडी रस्ता मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करणे, कोयना भुकंप निधी योजना सन 2022-23, (रु. 7 लाख)

मौजे पाटगांव पायरकोंड ते पागारवाडी रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, 2515 योजना सन 2023-2024 (रु. 6 लाख)

मौजे पाटगाव देवरुख रत्नागिरी  मेनरोड ते पागारवाडी अंतर्गत रस्ता मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी. 2515 योजना सन 2021-2022 (रु. 5 लाख)
हे रस्ते सदर योजनेतून मंजूर केले आहेत. त्याच पद्धतीने पाटगावातील ग्रामदेवता मंदिर येथील पुलासाठी रु. 2 कोटीचा निधी मंजूर केला व गावातील विकास कामे विविध योजनेतून करताना एकुण रु. 2 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर केला आहे.

आमदार साहेबांचा प्रेमळ स्वभाव व कामाची पद्धतीवर राधाकृष्ण नगर पागारवाडीतील ग्रामस्थ कमालीचे खूश झाले व त्यांनी सरांसोबत राहण्याचा निर्णय घेतला व राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आणि एकच निर्धार केला आता कोणतीही घडामोड होवो काहीही होवो आमच एकच लक्ष,,, आमदार शेखर निकम हाच आमचा पक्ष.... आम्ही सदैव शेखर सरांसोबतच.

पक्ष प्रवेश कर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार शेखर निकम म्हणाले की मतदारसंघातील सर्वच गावातील ग्रामस्थ हे माझ्या कुंटुबा प्रमाणे आहेत. आपण माझ्यावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केलात त्याबद्दल तुमचे आभार पक्षामध्ये स्वागत. यापुढे आपल्या वाडीतील समस्या व अडचणी या आपण सर्वानी एकत्र येऊन पाठपुरावा करुन सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करु. तुम्ही माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी किंचितही तडा जाऊ देणार नाही. गावातील प्रलंबीत कामे टप्या-टप्याने पुर्ण करु. या प्रवेशादरम्यान आमदार शेखर निकम यांनी राधाकृष्ण नगर पागारवाडीतील स्ट्रिट लाईट साठी लागणारे LED बल्ब जोडणीसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत तसेच नटेवाडी स्ट्रिट लाईट होणेसाठी तात्काळ कार्यवाही केली.

यावेळी प्रवेश कर्त्यांमध्ये दिलीप पागार (अध्यक्ष, राधाकृष्ण नगर पागारवाडीतील), अशोक पागार (माजी सरपंच), मनोहर खेडेकर, भास्कर खेडेकर, श्रीधर नटे (माजी सरपंच), आत्माराम नटे, वासुदेव खेडेकर, दिलीप खेडेकर, सुभाष पागार, रामचंद्र पागार, महादेव भालेकर, शिवराम भालेकर, दत्ताराम चाचे, प्रकाश कोटकर, निलेश मांडवकर, श्रद्धा पागार, दिपाली पागार, अश्विनी पागार, संगिता नटे, प्रिया पागार, प्रितेश पागार, मयूर खेडेकर, रोहीत नटे, सिद्धेश खेडेकर, प्रितम पागार, सौरभ पागार, गौरव पागार, प्रशांत पागार, सिद्धेश पागार, संकेत पागार,अक्षय पागार, अभिषेक कोटकर, ओंकार पागार, प्रणव चाचे, संदेश कोटकर या सर्वांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम