#Malshiras:माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते यांनी सामान्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनाला धरले धारेवर


महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस 
माळशिरस तालुक्याचे आमदार  रामभाऊ सातपुते  हे जिल्हा  नियोजन समीतीच्या बैठकीत  आज अतिशय  आक्रमक  झाले  यामध्ये  सिव्हिल हॉस्पिटलसाठी सिटी स्कॅन  मशीन ही जिल्हा  नियोजन  समीतीच्या  निधीतुन  ताबडतोब  खरेदी करावी.तसेच  आरोग्य  सुविधा  दुर कराव्यात  व कामचुकार  कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी  यावेळी  त्यांनी  लावुन  धरली.यामध्ये  आ रामभाऊ सातपुते यांनी सोलापूर  जिल्ह्यासाठी एकमेव  शासकीय  रुगणालय म्हणून  सिव्हिल हॉस्पिटल  आहे  मात्र  याठिकाणी  सिटी स्कॅन  मशीन  नाही  ती अनेक  वर्षापासून  बंद आहे याठिकाणी  जिल्हाभरातुन शेकडो  रुग्ण  दररोज  येतात  मात्र सिटी  स्कॅन  मशीन  नसल्याने  सर्व सामान्य  नागरिकांना  ना ईलाजाने बाहेर उपचार  करावे लागतात आर्थीक  परिस्थिती  नसतानाही रुगणांची एक प्रकारे पिळवणूकच होत आहे  यामुळे  सिव्हिल हॉस्पिटल साठी आरोग्य  विभागकाडुन सिटी स्कॅन  मशीन  मिळत नसेल तर ती मशीन  जिल्हा  नियोजन  समीतीच्या निधीतुन खरेदी करावी अशी  आक्रमक  भुमिका  माळशिरसचे  आ रामभाऊ सातपुते यांनी  सोलापूर येथे  पालकमंत्री  चंद्रकांत पाटील  यांच्या  अध्यक्षतेखाली  झालेल्या  जिल्हा  नियोजन  समीतीच्या बैठकीत  बोलताना केली.

यावर पालकमंत्री  चंद्रकांत पाटील  यांनी सर्व  आमदार व  खासदार  मिळुन आरोग्य  विभागाकडे  मशीनची महीनाभर मागणी करु ती मशीन  न मिळाल्यास जिल्हा  नियोजन  समीतीच्या  निधीतुन  ती मशीन  खरेदी करु असे यावेळी  सांगीतले.यावेळी आ  राम सातपुते  हे चांगलेच आक्रमक  झाले  ते म्हणाले  प्रत्येक वेळी  आम्ही  विषय उचलतो मात्र त्यावर कार्यवाही  होत नाही. आम्ही  राज्य  शासनाकडुन आणतो मात्र त्यानंतर  आवश्यक  कागदपत्रांची  पुर्तता  करण्याची जबाबदारी  कर्मचाऱ्यांनची असते पण जिल्हा परिषद  कर्मचारी  व ग्रामसेवक  हे वेळेवर कागदपत्रे  देत नसल्यामुळे  माळशिरस तालुक्यात आणलेला तिन कोटी रुपयांचा  निधी  परत जाण्याच्या  मार्गावर आहे. यामध्ये  वेळेत काम करुन  घेणयासाठी गटविकास अधिकारी सुद्धा  गंभीर नाहीत  याबाबत सर्व  अधिकाऱ्यांना  स्पष्ट  सुचना दया,कागदपत्रे  वेळेत न देणाऱ्या  अधिकारी  व कर्मचारी  यांच्यावर कारवाई  करण्याची मागणी  यावेळी  आ रामभाऊ सातपुते यांनी  केली.अनेक  ठिकाणी  प्राथमिक आरोग्य केंद्र  व उपकेंद्र  बांधुन  तयार आहेत पण कर्मचारी  नसल्यामुळे  ती ओसाड पडली आहेत.राज्य  शासनाच्या  आरोग्य  विभागातुन शक्य  नसेल तर राष्ट्रीय  ग्रामीण  आरोग्य अभियान  अंतर्गत  कर्मचारी  भरती ताबडतोब  करा व प्राथमिक आरोग्य  केंद्र  व उपकेंद्र  ताबडतोब  कार्यान्वित  करा यासाठी  स्वतंत्र  बैठक लावणयाची मागणीही आ रामभाऊ सातपुते  यांनी केली.तर अनेक  विदयार्थीना शैक्षणिक कर्जासाठी अडचणी  येत आहेत एखादया सर्व सामान्य  कुटुंबाचे सिबील स्कोर  खराब असेल तर  विदयार्थी बँकेत  हेलपाटे मारुनही कर्ज  मिळत नाही  यामुळे  विदयार्थचे शैक्षणिक  नुकसान होत आहे यासाठी  जिल्हा  स्तरावर  एक अधिकारी  नेमुन ही अडचण  सोडवावी यामध्ये  या विषयात विविध  महामंडळ  असतील  तर. त्या बैठका व समन्वय  त्या त्या तालुकयात बैठका घेऊन  झाला पाहिजे  जेणेकरून  सर्व सामान्य  विदयार्थीना शैक्षणिक कर्ज  ताबडतोब  मिळणे सोपे होईल  अशी  भुमीका  यावेळी  आ रामभाऊ सातपुते  यांनी जिल्हा  नियोजन समितीच्या  आयोजित करण्यात  आलेल्या  बैठकीत  केली .

यावेळी  अनेक  विषयावर  आ रामभाऊ सातपुते  हे आक्रमक  झाल्याचे पाहवयास  मिळाले यामध्ये  आरोग्य  विभागाचा विषय असो,किंवा  जलजिवन  व शैक्षणीक  प्रश्ननावर व कामकुचार अधिकारी  व कर्मचारी  यामुळे विकास  कामे वेळेत होत नाहीत याबाबत ते अतिशय  आक्रमक  भुमीकेत दिसले. 

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत