Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:महापुरुषांना कोणीही जातीपातीच्या भिंतीत बांधू शकत नाही - राजकुमार हिवरकर पाटील


महादरबार न्यूज नेटवर्क -
सावित्रीमाई फुले यांची १९३ वी जयंती नातेपुते ग्रामीण रुग्णालयात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब कार्यसम्राट आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या सूचनेने स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणून गरोदर मातांची तपासणी करून ज्येष्ठ नागरिक माता-भगिनींना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला त्यांना समुपदेशन करण्यात आले.


यावेळी बोलताना राजकुमार पाटील म्हणाले की सावित्रीमाई फुले यांनी समाज सुधारण्याचा खूप मोठा टप्पा पार केला म्हणून आज आज गावच्या सरपंच महिला शिक्षिका शासकीय अधिकारी आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती या ठिकाणी महिला दिसतात त्या फक्त सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाची क्रांती म्हणून सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात केशवपतना ची परंपरा नाभिक समाजाला बरोबर घेऊन त्यांची जनजागृती करून त्यावेळचे हिंदुस्थानातलं मोठं आंदोलन उभ केलं त्यामुळे महिलांना पतीच्या देहांतानंतर केशव पतन करून विद्रूप केलं जायचं की प्रथाच सावित्रीमाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी बंद केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली राष्ट्रमाता जिजाऊ कडून प्रेरणा घेतली आणि त्या प्रेरणेतून स्त्री  शिक्षणाचा जागर केला आणि समाज व्यवस्था बदलण्यासाठी सावित्रीमाई फुले यांना  शिक्षण दिलं पहिली शिक्षिका पहिली मुख्याध्यापिका या सावित्रीमाई फुले झाल्या सावित्रीमाई फुले यांनी फातिमा बेबी कौर या मुस्लिम महिलेला शिक्षण देऊन शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा बनवले त्यामुळे सर्व जाती धर्मात त्या महापुरुषांचा समाजसुधारकांचा हा तर सदैव स्तर उंची राहील त्यामुळे कोणत्याही समाजसुधारकांना महापुरुषांना जातीपातीच्या भिंतीत बांधता येणार नाही असे मत यावेळी व्यक्त केले. तसेच औषध निर्माण अधिकारी देवकाते सर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, नातेपुते शहराध्यक्ष पोपटराव शिंदे, शिवसेनेचे गटनेते दादाभाई मुलानी, प्रभाग 7 प्रमुख सनी बरडकर, प्रभाग १३ चे राजू मुलानी,  तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे सर, भैया ठोंबरे,
डॉ.नम्रता होरा मॅडम  वैद्यकीय अधिक्षक,
डॉ. शिवाजी शेंडगे , डॉ. सुजाता आंधळकर ,  संजय देवकाते , साधना दोलताडे , रंजना मदने सिस्टर , विद्या कुंभार सिस्टर , पाखरे सिस्टर ,  भूषण दळवी ,   संभाजी मैद ,  संतोष नडे , जावेद मुलाणी , नवनाथ भोसले  , आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन डॉ. वाघमोडे यांनी
केले. 

Post a Comment

0 Comments