#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
वनाझ परिवार विद्या मंदिर कोथरूड पुणे, शुक्रवार दिनांक २९डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. यावर्षी स्नेहसंमेलनाची थीम नातं अशी ठरवण्यात आली होती या विषयाला अनुसरून बालवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नात्यांवरती आधारित गाणी निवडली यामध्ये डान्स ,नाटक अशा वेगवेगळ्या बाबींचा समावेश होता.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कांचन रुपेश कुंबरे यांची उपस्थिती लाभली. तसेच वनाझ शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा रजनी दाते, जनकल्याण संस्थेचे पदाधिकारी, वनाझ शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, वनाझ कामगार संघटनेचे पदाधिकारी इतर शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
'आमच्या पप्पानी गंपती आणला' ते 'सलाम तुझे ' इस्रो हा टप्पा गाठताना भाऊ-बहीण आई -वडील, देव- भक्त , जंगल आणि मानव यांचे नाते महाराष्ट्रातील मराठी भाषेशी नाते ,सैनिकाचे देशाशी नाते मोबाईलशी नाते ,मैत्रीचे नाते ,बाप- लेकीचे नातेअशा वेगवेगळ्या नात्यांवर आधारित अतिशय देखणी सादरीकरणे झाली.
बालवाडी विभागातील अतिशय चिमुकल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचे डान्स देखील अत्यंत सुंदर झाले. मोठ्या विद्यार्थ्यांचे डान्स अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे होते. सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना हसवण्यापासून रडवण्यापर्यंतचे अतिशय सुंदर आकर्षक डान्स परफॉर्मन्स सादर केले.
टाळ्यांच्या प्रचंड आवाजाने नाट्यगृह दणाणून सोडले होते.
सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे डान्स बसवण्यात अतिशय मेहनत घेतली.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सांभाळणे विद्यार्थ्यांना नाट्यगृहात योग्य ठिकाणी बसवणे इत्यादी कामात पालक प्रतिनिधींनी मोलाची मदत केली.
मुख्याध्यापिका मा.सौ.अनिता दारवटकर,सौ.शीतल देशमुख,सौ. वृषाली वाशिमकर, सर्व विभागाच्या पर्यवेक्षिका ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक प्रतिनिधी यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
Comments
Post a Comment